टीम मंगळवेढा टाईम्स ।
इस्लाम धर्मांचे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर सल्ललाहू यांच्या ईद मिलादुन्नबी जयंतीनिमित्त जामिया मस्जिद ,मंगळवेढा येथे स्वीट मदिना सोशल फाउंडेशन, ब्रह्मपुरी यांच्या वतीने जे मदरसा अथवा घरामधे कुरान पठणचे शिक्षण घेतले जात आहे अशा मुला-मुलींना, थोर व्यक्तींना पवित्र कुरान पाक ग्रंथ मोफत भेट देण्यात आले.
यावेळी मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील युवकांनी सदर कार्यक्रम प्रसंगी नाते पाक यास प्रथमत सुरवात करून हजरत मोहम्मद पैगंबर यांचे जीवनावर विचार व शिकवण यांचे प्रवचन केले.
स्वीट मदिना सोशल फाउंडेशन वतीने मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थी पवित्र कुराण ग्रंथाचे सराव करीत आहेत त्यांना ईद ए मिलादूनब्बी निमित्त पवित्र कुराण ग्रंथ भेट देण्यात आली.
यावेळी जमिया मस्जिद से मौलाना मिराज यांनी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावरील आधारीत प्रवचन करून मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवशी इतर खर्चांना फाटा देत साध्या पद्धतीने मदरशाच्या शाळेतील मुला मुलींना मिठाई व पुष्प गुच्छ भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी स्वीट मदिना सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष दावल इनामदार, मौलाना हाफिज मोईनुद्दीन, जमीर इनामदार,इरफान काझी ,जावेद मुजावर, तोफीक मुजावर, बडेसाब मुल्ला , शौकत पटेल,
इरफान पटवेकर, दादा पठाण सादिक शेख, तनवीर इनामदार अजीज मसुरे, मुस्तफा मुजावर, आफ़रीन शेख , आयेशा रफीक शेख , वसीम युपी वाले ,जुमला आशिकाने मुस्तफा आदी मदरशातील विद्यार्थी उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज