टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळेवढा येथील प्रसिध्द डॉ.प्रशांत प्रभाकर नकाते (वय -३४ वर्षे ,रा.यशवंत नगर, मंगळवेढा) यांची नर्सवर बलात्कार केल्या प्रकरणीच्या खटल्यात पंढरपूर येथील अति. सत्र न्यायाधिश श्रीमती के.व्ही.बोरा यांनी पोलीस स्टेशन व कोर्टातील हजेरीवर सशर्त जामीन मंजुर केला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, डॉ. प्रशांत नकाते यांचे मंगळवेढा येथे स्वत:चे हॉस्पीटल आहे. त्यांनी एका नर्सला आयुष्यभर सांभाळतो असे आश्वासन देवून तिचेवर तिचे इच्छेविरुध्द शरिरसंबंध केला व तद्नंतर फिर्यादीस दिवस गेलेनंतर तिचा गर्भपात केला व सदरची बाब कोणास सांगितली तर जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर दि.१८ जून २०२० रोजी मनस्तापामुळे व तिची बदनामी होईल या भितीने यातील फिर्यादी नर्सने अंगावर बाटलीत आणलेले पेट्रोल ओतुन घेवून स्वतःला पेटवुन घेतले स्वरुपाची फिर्याद मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे दाखल झालेली होती. त्याअनुषंगाने गुन्हा दाखल होवून डॉ.नकाते यांना अटक झाली होती.
सदर प्रकरणी डॉ.प्रशांत नकाते यांनी अॅड. शशि कुलकर्णी यांच्यामार्फत जामीन मिळण्यासाठी पंढरपूर येथील सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर सरकारी वकिलांनी लेखी म्हणणे देवून जोरदार आक्षेप घेतलेला होता.
सदर प्रकरणी आरोपीचे वकिल अॅड. श्री. शशि कुलकर्णी यांनी असा युक्तीवाद केला की , सदर प्रकरणातील तपास पुर्ण होऊन आरोपपत्र दाखल झालेले आहे, हा गुन्हा केवळ नोकरी व त्यासंदर्भातील झालेल्या वादामुळे दाखल झालेला आहे.
आरोपीने फिर्यादीसोबत कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य केलेले नाही. फिर्यादीने सदरचे कृत्य हे तिला आलेल्या नोकरीच्या नैराश्यातुन केलेले असावे , त्याकरिता आरोपी डॉक्टरांना जबाबदार धरणे योग्य नाही , त्यामुळे आरोपीस जामीन मंजुर करण्यात यावा इत्यादी स्वरुपाचा युक्तीवाद केला.
युक्तीवादा पृष्ठर्थ्य त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे काही निवाडेही सादर केले. सदरचा आरोपीच्या वकिलांचा युक्तीवाद विचारात घेवून पंढरपूर येथील सत्र न्यायालयाने डॉक्टर आरोपीस २५ हजारांच्या जातमुचलक्यावर व पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याचे, साक्षीदारावर दबाव न आणणेचे अटीवर सशर्त जामीन मंजुर केला.
सदर प्रकरणी आरोपी डॉ. प्रशांत नकाते यांच्यातर्फे अॅड. शशि कुलकर्णी , अॅड.ओंकार बुरकुल, अॅड.देवदत्त बोरगांवकर यांनी तर सरकारतर्फे अॅड.सारंग वांगीकर यांनी काम पाहिले.
Dr.Prashant Nakate granted bail on condition of police station attendance In the rape case
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज