mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

वाहनचालक धास्तावले! मंगळवेढ्यात वाहतूकीस अडथळा निर्माण करणारे 221 गाड्यावर कारवाई

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 15, 2023
in मंगळवेढा
सोलापूर जिल्ह्यात यांनाही असणार हेल्मेट बंधनकारक; दोन आठवडे प्रबोधन त्यानंतर दंडात्मक कारवाई

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

मंगळवेढा शहरात वाहन चालक रस्त्यात गाड्या कुठेही उभा करीत असल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होत होता. दरम्यान मंगळवेढा पोलीस ठाण्याचा कार्यभार प्रभारी पोलीस अधिकारी नयोमी साटम यांनी स्विकारल्यानंतर

दि.1 ते 10 ऑगस्ट दरम्यान छोट्या-मोठ्या वाहनावर वाहतूक शाखेच्या पोलीसांनी कारवाई करुन 1 लाख 34 हजार 400 रुपयाचा दंड केवळ दहा दिवसात वसूल केला आहे. दरम्यान या कारवाईमुळे बेशिस्तपणा वाढलेल्या वाहन चालकांना चांगलीच चपराक बसली आहे.

मंगळवेढा शहरात वाहन चालकामध्ये बेशिस्तपणा मोठ्या प्रमाणात वाढला होता. शहरातील मुळात रस्ते हे लहान असून व्यापार्‍यांनी दुकानाच्यापुढे पार्किंगची व्यवस्था न केल्यामुळे ग्राहकांची आलेली वाहने नाईलाजाने रस्त्यावर लावून खरेदीला जाण्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत असे.

आठवडी बाजार दिवशी याचा त्रास नागरिकांना अधिक प्रमाणात सोसावा लागत असे. प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी नयोमी साटम यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर शहरातील वाहनधारकावर कारवाईचा बडगा उचलून नियमांचे पालन न करणार्‍या वाहन चालकावर कारवाई करुन शिस्तीचे पालन करण्यास भाग पाडले आहे.

दरम्यान वाहन चालकांना काही प्रमाणात शिस्त लागत असल्याचे चित्र आहे. पोलीस अधिकारी साटम यांची पोलीस व्हॅन दिसताच वाहन चालक कारवाईच्या भितीपोटी गाड्या घेवून धूम ठोकत असल्याने पोलीसांनी चक्क व्हॅन ऐवजी खाजगी वाहनाचा वापर करुन कारवाई मोहिम सुरु केली आहे.

नित्यनियमाने दररोज सायंकाळी शहराच्या मध्यभागातून पोलीसांची खाजगी गाडी फिरत असल्याने वाहन चालकांना शिस्त लागत आहे. परिणामी दामाजी चौक,शिवप्रेमी चौक,चोखामेळा चौक, मुरलीधर चौक आदी ठिकाणी रस्ते मोकळे झाल्याने सुटसुटीतपणा दिसत आहे.

दामाजी चौकात भररस्त्यावर छोटे-मोठे हातगाडे दिवसभर उभे करत असल्याने ग्राहक आपल्या गाड्या रस्त्यावर उभ्या करत असल्याचे चित्र होते. या व्यवसायिकांना पोलीस अधिकारी साटम यांनी रस्त्यावर हातगाडे उभे करु नका सक्त सूचना केल्याने ते हातगाडे पाठीमागील बाजूला सरकावल्याने हा चौक येणार्‍या-जाणार्‍यासाठी विनाअडथळा ठरला आहे.

या कारवाईत वाहतूक शाखेने रस्त्यावर अडथळा निर्माण करणार्‍या 193 वाहनावर केसेस करुन 1 लाख 15 हजार 500 तर लायसन्स नसणे, सीटबेल्ट न लावणे, ट्रिपल सीट व इतर 28 केसेस करुन 18 हजार 900 इतका दंड वसूल केला आहे. दरम्यान कारवाईमुळे वाहनचालकांना शिस्त लागत असल्याच्या भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

पोलीस अधिकारी साटम ह्या मंगळवेढा पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून किमान एक वर्ष रहाव्यात अशा प्रतिक्रिया ही सुज्ञ नागरिकामधून व्यक्त होत आहेत. या कारवाई मोहिमेत वाहतूक शाखेचे पोलीस नाईक शिवाजी पांढरे,पोलीस अंमलदार प्रविण जाधव, सचिन काळेल सहभागी आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा पोलिस स्टेशन

संबंधित बातम्या

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 17, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
Next Post
जनतेच्या कामांना प्रथम प्राधान्य देणार; मंगळवेढयाचे नवनियुक्त तहसीलदार मदन जाधव यांनी स्विकारला कार्यभार; त्यांच्यापुढे असणार  ‘हे’ आव्हाने

भारतीय स्वातंत्र्य दिन! मंगळवेढ्यात ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी ९.०५ वाजता

ताज्या बातम्या

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 17, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..