मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
सोलापूर जिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षकाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज पहाटे उघडकीस आली आहे.
अज्ञात मारेकरांकडून पाठीमागून धारदार शस्त्राने वार करून पोलीस उपनिरीक्षकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
दरम्यान, ही घटना आज बुधवारी सकाळी ६ च्या सुमारास वासुद (ता.सांगोला) येथील केदारवाडी रोडवर उघडकीस आली.
पोलीस उपनिरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे (वय ४२) हे वासूद (ता.सांगोला) जेवणानंतर रात्री घरापासून केदारवाडी रोडवर शतपावली करण्यासाठी गेले असता बुधवारी रात्री ११ च्या दरम्यान अगोदरच दबा धरून बसलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी पाठीमागून डोक्यात वार करून खून केला.
रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत म्हणून नातेवाईकांनी आज सकाळी शोध घेतला असता वासूद- केदारवाडी रोडनजीक त्यांचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी हे पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.(स्रोत: लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज