मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
पोलिस कर्मचाऱ्यांना आता विभागीय परीक्षेतून पुन्हा पोलिस उपनिरीक्षक होता येणार आहे. परीक्षा न घेण्याचा निर्णय तीन वर्षांनी शासनाने मागे घेतला आहे. आता पोलिस कर्मचाऱ्यांसाठी पोलिस उपनिरीक्षक (फौजदार) होण्यासाठी २५ टक्के जागा राखीव असणार आहेत.

पोलिस शिपाई ते सहायक पोलिस उपनिरीक्षकपर्यंतच्या पोलिस कर्मचाऱ्यांना खात्यांतर्गत विभागीय परीक्षा देऊन थेट पोलिस उपनिरीक्षक होण्याची संधी मिळत होती.

यासाठी २५ टक्के जागाही राखीव ठेवण्यात येत होत्या. मात्र, २०२२ मध्ये सरकारने खात्यांतर्गत स्पर्धा परीक्षा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या ऐवजी सरळ सेवा आणि पदोन्नती अशा दोनच प्रकारांत पोलिस उपनिरीक्षक होण्याची संधी दिली गेली होती.

प्रत्येक पोलिस कर्मचारी सेवानिवृत्त होण्यापूर्वी पोलिस उपनिरीक्षक होईल अशी तरतूद केली होती. त्याला ग्रेड पीएसआय असे नाव दिले होते. दरम्यान, ही विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्याची मागणी पोलिस कर्मचाऱ्यांमधून होत होती.

याबाबत ३ ऑक्टोबर २०२३ रोजी पोलिस महासंचालकांनी प्रस्ताव पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे. आता पुन्हा पूर्वीप्रमाणे विभागीय परीक्षा देऊन पोलिस कर्मचाऱ्यांना थेट पोलिस उपनिरीक्षक होता येणार आहे.

असा असेल कोटा
पोलिस उपनिरीक्षकांच्या ५० टक्के जागा या सरळ सेवा भरतीतून भरल्या जातील. २५ टक्के जागा या पदोन्नतीतून भरल्या जाणार आहेत. उर्वरित २५ टक्के जागा या विभागीय स्पर्धा परीक्षेतून भरण्यात येणार आहेत. पूर्वीचेच सूत्र पुन्हा लागू करण्यात आले आहे.
कोण देऊ शकेल परीक्षा, काय आहे पात्रता ?
पोलिस शिपाई, पोलिस नाईक, पोलिस हवालदार व सहायक पोलिस उपनिरीक्षक हे परीक्षा देऊ शकतील. परीक्षेच्या वर्षी उमेदवाराचे वय ३५ वर्षे असावे. मागास प्रवर्गासाठी ५ वर्षे वयात सूट.

उमेदवाराविरोधात कुठलीही विभागीय चौकशी, फौजदार कारवाई नसावी. उमेदवार १० वी उत्तीर्ण असेल तर त्याची सेवा ६ वर्षे अखंडित हवी. १२ वी उत्तीर्ण असेल तर ५ वर्षे व पदवी उत्तीर्ण असेल तर ४ वर्षे अखंडित सेवा आवश्यक आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












