टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे तर लसीकरण मोहीम देखील मोठ्या प्रमाणात राबविली जात असून सोलापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 18 हजार 122 जणांना कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस टोचण्यात आली आहे.
आता लसीकरणाची केंद्रे वाढविण्यात आली असून आज 53 केंद्रांवर एकाच दिवशी दहा हजारांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना लसीकरण केले जाणार आहेकोरोनाचा विषाणू हद्दपार करण्याच्या हेतूने आता लसीकरणाचा वेग वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
बैठकीतमध्ये लसीकरणासंदर्भात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. त्यात लस न घेतलेले शासकीय व खाजगी डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर (पोलिस, महसूल, पंचायत समितीकडील अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, महापालिका कर्मचारी, नगरपरिषदेकडील कर्मचारी) यांना लस टोचली जाणार आहे.
अजूनही 36 हजार 636 जणांचे लसीकरण होणे बाकी आहे. त्यातील पहिला टप्पा आज सुरु होणार आहे. अशा प्रकारची ही राज्यातील पहिलीच मोहीम आहे.
यासाठी आवश्यक कोविड-19 लस जिल्ह्यास प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. अनिरुध्द पिपंळे यांनी दिली.
कोरोना लसीकरणाचा पहिला डोस सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करून, पडताळणी करुन देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.(सकाळ)
आज सोलापूर जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी होणार लसीकरण
मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय, महिला हॉस्पिटल मंगळवेढा,अक्कलकोट (शिरवळ) प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, अक्कलकोट, बंदिछोडे हॉस्पिटल, बार्शी, ग्रामीण रुग्णालय, बार्शी, एनयुएचएम, बार्शी, बकरे हॉस्पिटल, सुश्रुत हॉस्पिटल, चौधरी हॉस्पिटल, वैराग प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, पांगरी, उपजिल्हा रुग्णालय करमाळा,
प्राथमिक आरोग्य केंद्र, जेऊर, ग्रामीण रुग्णालय माढा, ग्रामीण रुग्णालय कुर्डूवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र मोडनिंब, प्राथमिक आरोग्य केंद्र, टेंभूर्णी, प्राथमिक आरोग्य केंद्र कामती, गोळवलकर हॉस्पिटल, झाडबुके हॉस्पिटल, ग्रामीण रुग्णालय मोहोळ, उपजिल्हा रुग्णालय अकलूज, अश्विनी हॉस्पिटल नातेपूते, ग्रामीण रुग्णालय माळशिरस, राणे हॉस्पिटल अकलूज, श्रेयस हॉस्पिटल श्रीपूर, प्राथमिक आरोग्य केंद्र वेळापूर,
पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय, लाईफलाईन हॉस्पिटल पंढरपूर, ऍपेक्स पंढरपूर, ग्रामीण रुग्णालय करकंब, विठ्ठल हॉस्पिटल पंढरपूर, गादेगाव, कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र,
सांगोला ग्रामीण रुग्णालय, दक्षता हॉस्पिटल, बाबर हॉस्पिटल सांगोला, मजरेवाडी नागरी आरोग्य केंद्र, सोरेगाव, रामवाडी, देगाव, जोडभावी पेठ, विडीघरकूल, मुद्रा सनसिटी, भावनाऋषी, मदरटेरेसाटेरेसा पॉलरक्लीनीक, एसआरपी कॅम्प, पोलीस हेडक्वॉटर, सिध्देश्वर हॉस्पिटल,
यशोधरा हॉस्पिटल, मोनार्क हॉस्पिटल, धनराज गिरजी हॉस्पिटल, मंद्रूप ग्रामीण रूग्णालय, अश्विनी ग्रामीण रूग्णालय कुभांरी, कोंडी प्राथमिक आरोग्य केंद्र.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज