टीम मंगळवेढा टाईम्स ।
कर्नाटक राज्यातून मंगळवेढा,पंढरपूर व अन्य ठिकाणी अशोक लेलंटमधून विक्री करण्यास येणारा बेकायदा 24 लाख 95 हजार रुपये किमतीचा गुटखा मंगळवेढा पोलिसांनी पकडून
वैभव विजयकुमार जगताप (वय.26 रा.कवठेमहांकाळ), सुरज अनिल खताडे (वय 22 रा.पंढरपूर) या दोघाविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड करण्यात आले आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,कर्नाटक राज्यातून मोठया प्रमाणात गुटखा येत असल्याची गोपनीय माहिती नव्याने कार्यभार स्विकारलेले पोलिस निरिक्षक रणजित माने यांना मिळताच त्यांनी
पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते,अप्पर पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव, डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तयार करून सोड्डी मार्गावर दि.26 रोजी रात्रौ 9.00 वा. सापळा लावला.
या दरम्यान अशोक लेलंट वाहन क्रमांक एम एच 13,बी.क्यू.0690 हे येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी इशारा करून वाहन थांबवून त्यातील चालक तथा आरोपी सुरज खताडे व मालक वैभव जगताप यांच्याकडे हौदयातील मालाबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देवू लागल्याने पोलिसांचा संशय बळावल्याने पाठीमागे जावून पाहिले असता गुटखाजन्य पदार्थाचा वास आला.
यावेळी पोलिस पथकाने हे वाहन ताब्यात घेवून मंगळवेढा पोलिस स्टेशन आवारात आणून त्याची तपासणी केली असता यामध्ये 7 लाख 68 हजार किमतीचा 32 पोती विमल पानमसाला, 1 लाख 92 हजार रुपये किमतीची 6 पोती सुगंधी तंबाखू, 2 लाख 37 हजार 600 रुपये किमतीचा 6 पोती विमल पान मसाला, 26 हजार 400 रुपये किमतीची सुगंधी तंबाखू एक पोते,
4 लाख 3 हजार 200 रुपये किमतीचा आर.एम.डी.पान मसाला 14 बॉक्स,1 लाख 68 हजार रुपये किमतीचा एम.सेंटेंड तंबाखू 7 बॉक्स,7 लाख रुपये किमतीचा अशोक लेलंट टेंपो सह असा एकूण 24 लाख 95 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिस पथकात पोलिस हवालदार दयानंद हेंबाडे,पोलिस शिपाई सोमनाथ माने, मळसिध्द कोळी आदींचा समावेश होता. याची फिर्याद अन्न औषध प्रशासनचे उमेश भुसे यांनी दिली आहे.
नव्याने कार्यभार स्विकारलेले पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी प्रथमच मोठी कारवाई केल्याने अवैध गुटखा विक्री करणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.मंगळवेढयाच्या इतिहासात पहिल्यांदाच गुटख्याची एवढी मोठी कारवाई झाल्याने या कारवाईबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
भाळवणी गावात गुटका माफियांचे मोठे रॅकेट
मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी गावात एक व्यक्ती गेल्या अनेक वर्षापासून गुटक्याचे मोठे रॅकेट चालवत आहे तसेच मंगळवेढा-चडचण हे केवळ 25 कि.मी. अंतर असल्याने व कर्नाटकमध्ये गुटख्यावर बंदी नसल्यामुळे मोठया प्रमाणात गुटखा वाहतूक होवून ग्रामीण भागातून त्याची पान टपरी, हॉटेल येथे सर्रास व उघडपणे विक्री होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
अन्न भेसळ विभाग या कारवाईबाबत जागरूकता दाखवत नसल्यामुळे याचा सुळसुळाट वाढत जात असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्र सरकारने तरूण युवकांच्या जीवनाचा विचार करून गुटख्यावर बंदी आणली आहे.शेजारच्या राज्यात मात्र खुले आम विक्री होत असल्याने त्याचा गैरफायदा व्यवसायिकवाले उचलत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज