टीम मंगळवेढा टाईम्स । मानवी प्लाझ्मा व रक्त उत्पादनांतील कोरोना व्हायरसची संख्या कमी करण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक नवी पद्धत विकसित केली आहे. ‘व्हिटॅमिन रायबोप्लेविन व अतिनिल किरणांमुळे प्लाझ्मा व संपूर्ण रक्त उत्पादनांतील (Red blood cell platelets, plasma etc.) कोरोना विषाणूंची संख्या कमी होतेअसे त्यांनी म्हटले आहे.
या पद्धतीमुळे रुग्णाला रक्त चढवताना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. कोविड १९ महामारीसाठी कारणीभूत असणारा नोवल कोरोना व्हायरस किंवा ‘ सार्स सीओव्ही-२ चा प्रसार रुग्णाला रक्त चढवताना होतो किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. असे अमेरिकेतील कोलोरॅडो स्टेट विद्यापीठाच्या (CSU) संशोधकांनी म्हटले आहे.
पीएलओएस वन नियतकालिकात प्रकाशित झालेल्या या संशोधनात संशोधकांनी ९ प्लाइमा व ३ संपूर्ण रक्त उत्पादनांवर उपचार करण्यासाठी मिरॅसोल पॅथोजन रिडक्शन टेक्नॉलॉजी सिस्टिम’नामक उपकरणाचा वापर केला.आम्हाला उपचाराअंती व्हायरस मोठ्या प्रमाणात काढून टाकण्यात यश आले. उपचारानंतर आम्हाला एकही विषाणू आढळला नाही असे या शोधनिबंधाच्या सहलेखिका इसाबेला रेगन यांनी म्हटले आहे.
CSU’च्या संशोधनाचे वरिष्ठ लेखक गुडरिच यांनी तयार केलेले हे उपकरण अतिनिल किरणांवर आधारित काम आहे. हे उपकरण १ ९ ८० च्या दशकात रक्त व रक्त उत्पादनांतील एचआयव्हीचा विषाणू वेगळा करण्यासाठी तयार करण्यात आले होते. गुडरिच यांनी सद्यःस्थिती ‘ मिरॅसोल’चा वापर अमेरिकेबाहेर विशेषतः यूरोप , पश्चिम आशिया व आफ्रिकेत सुरू असल्याचे सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज