मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील जंगलगी येथे सोलापूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून बेकायदेशीर १ लाख ५३ हजार ८०० रुपये किमतीची शस्त्रे जप्त करून फाईक मुस्ताक कळमबेंकर (वय ४६, रा. मिल्लत नगर, रत्नागिरी), निगोंडा हणमंत बिराजदार (वय ३७), राजकुमार हणमंत बिराजदार (दोघे रा. जंगलगी) या तीघांविरूध्द भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तीघा आरोपींना गजाआड केले आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, सोलापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेला मंगळवेढ्यातील जंगलगी येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररित्या शस्त्रे ठेवली असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलिस कार्यालय, मंगळवेढा यांच्याकडून मिळताच सदर पथक खात्री करण्यासाठी मंगळवेढ्यात दाखल झाले.
पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, मंगळवेढयाचे डी. वाय. एस. पी. विक्रांत गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक विशाल वायकर, पोलिस निरिक्षक सुरेश निंबाळकर,
मंगळवेढयाचे पोलिस निरिक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने सदर ठिकाणी दि.५ फेब्रुवारी रोजी दुपारी २.४८ वा. छापा टाकून देशी बनावटीचे एक गावठी पिस्टल, ५ जीवंत काडतुसे मिळून आली.
तसेच आरोपी फाईक कळमबेंकर व निगोंडा बिराजदार यांची अंगझडती घेतली असता आरोपी फाईकच्या कमरेला डाव्या बाजूस पँटीत खोचलेली एक देशी बनावटीची पिस्टल मॅगझीनसह व पँटच्या उजव्या खिशातून ५ जीवंत काडतुसे व मोबाईल हँडसेट मिळून आला.
तदनंतर पोलिसांनी शस्त्र बाळगण्याचा परवाना आहे का असे विचारले असता परवाना नसल्याचे सांगितले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता चार देशी बनावटीची पिस्तूल व काडतुसापैकी एक पिस्टल व ५ जीवंत काडतुसे कळंबा जेलमध्ये असताना ओळख झालेला मित्र फाईक यास दिले होते. व त्याची राहण्याची व्यवस्था राजकुमार बिराजदार यांच्या शेतात केली असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी या धाडीत जवळपास १ लाख ५३ हजार ८०० रुपये किमतीचा बेकायदा शस्त्र जप्त केली आहेत. याची फिर्याद स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार प्रकाश कारटकर यांनी दिली आहे.
ही कामगिरी पोलिस उपनिरिक्षक रवीराज कांबळे, पोलिस हवालदार विरेश कलशेट्टी, महिला पोलिस हवालदार अश्विनी गोटे, पोलिस अंमलदार अजय वाघमारे, राहुल दोरकर, हरीदास थोरात, चालक सुनिल पवार आदींनी केली आहे.
दरम्यान मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागात अवैध शस्त्रसाठा मोठया प्रमाणात सापडल्यामुळे मंगळवेढा तालुका हादरून गेला आहे. मंगळवेढ्यालगत कर्नाटक सीमा असल्यामुळे बेकायदेशीर शस्त्रसाठा येत असल्याचा संशयही व्यक्त होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज