मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
अवैध देशी व विदेशी दारूचे वाहतूक करणारे महिंद्रा पिकअप सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे यांनी पकडले असून 10 लाख 20 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवेढा पोलिसांना गोपनीय बातमीच्या आधारे हुलजंती येथे अवैध दारू संदर्भात माहिती मिळाली होती.
त्यादृष्टीने सपोनि बापूसाहेब पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अंकुश वाघमोडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल 905 कोळी, पोलीस शिपाई 886 कोळी, पोलीस शिपाई 461 राऊत हे गस्त करत असताना
पिकअप गाडी क्रं. एम एच 10 डि.टी 1276 मधून अवैधरित्या दारूचे वाहतूक होणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती.
सोड्डी ते हुलजंती रोड दरम्यान फौजी धाब्याच्या बाजूस पिकअप गाडी मिळून आल्याने त्याची तपासणी केली असता 10 लाख 20 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल अवैधरित्या वाहतूक करीत असताना मिळून आल्याने मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूसाहेब पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली
हुलजंती दूर शेत्र चे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे यांच्या पथकाने केले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज