mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ब्रेकिंग! शेतकऱ्याच्या पानबुडी मोटर चोरणाऱ्या चोरट्यांना LCB च्या पथकाने केले जेरबंद

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 6, 2021
in सोलापूर
राष्ट्रीय महामार्गालगत आसलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर दावा करणारे तिघे जेरबंद

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी, सारोळे फाटी, पाटकूल, पेनूर आदी शिवारातील शेतातून व कॅनाॅल मधून पानबुडी मोटारी चोरीच्या घटनेप्रकरणी बालाजी उर्फ कार्तिक महादेव डोके (22),अजित नवनाथ सावत (25)
दोघे रा.पेनूर ता.मोहोळ जि सोलापूर या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

आरोपींकडून 5 पानबुडी मोटारसह एकूण 47 हजार रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.5 मार्च 2021 रोजी मोहोळ पोलीस ठाणे येथे पाटकुल ता. मोहोळ येथील फिर्यादी दादा सातपुते यांनी फिर्याद दिल्याने मोहोळ पोलीस ठाणे गुरंन 221/2021 भादविकाक 379 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

मोहोळ तालुक्यातील मौजे कोन्हेरी, सारोळे फाटी, पाटकूल, पेनूर इत्यादी शिवारातील शेतातून व कॅनाॅल मधून पानबुडी मोटारी चोरीच्या घटना घडल्या होत्या.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, पेनूर ता. मोहोळ जि. सोलापूर येथील काही इसम हे शेतक-यांच्या विहिरीतून, कॅनाॅल इत्यादी ठिकाणातून पानबुडी मोटार चोरून त्याची विक्री करीत असल्याबाबत बातमी मिळाल्याने, सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे व त्यांच्या पथकास तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले.

सहा.पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी पथकासह पेनूर ता. मोहोळ जि. सोलापूर येथे जावून बातमीप्रमाणे खात्री केली असता पेनूर गांवातील काही इसम हे मागील काही दिवसांपासून शेतक-यांच्या पानबुडी मोटार हया चोरून त्याची विक्री करीत असल्याची खात्री झाली.

बातमी प्रमाणे पेनूर ता. मोहोळ जि. सोलापूर येथून एका इसमास ताब्यात घेवून वरील गुन्हयांतील चोरीस गेलेल्या मालाच्या अनुशंगाने त्याच्याकडे विचारपूस करता तो सुरुवातीस उडवा उडवीचे उत्तरे देवू लागला. त्यास अधिक विश्वासात घेवून विचारपूस करता त्याने सांगितले की, मागील काही महिन्यापूर्वी मी व माझा एक साथिदार असे दोघांनी मिळून पाटकुल शिवारातील दादा सातपुते यांचे शेतातील विहीरीतून पानबुडी मोटारची चोरी केली असल्याचे सांगितले.

तसेच त्यांने साथिदारासोबत आणखीन ठिकाणी चोरी केलेल्या 4 पानबुडी मोटार चोरी केल्याची कबुली दिली. सदर चोरलेल्या पानबुडी मोटार हया गांवातीलच लोकांना विकल्या असल्याचे त्यांने सांगितले.

ज्यांना पानबुडया मोटार विकल्या आहेत त्यांनी सदरच्या मोटारी हया आणून गुन्हयाच्याकामी जमा केल्या आहे. सदर आरोपींना पुढील कारवाई करीता मोहोळ पोलीस ठाणेच्या ताब्यात दिले आहे. त्यांच्याकडून आणखीन पानबुडी मोटार चोरीचे गुन्हयांची उकल होण्याची शक्यता आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्षनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सहा.पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सफौ ख्वाजा मुजावर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख यांनी बजावली आहे.त्याच्या या कामगिरीचे शेतकरी वर्गातून कौतुक होत आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कामगिरीसोलापूरस्थानिक गुन्हे शाखा

संबंधित बातम्या

नागरिकांनो! ‘या’ दिवशी आठवडा बाजार राहणार बंद; मतदान केंद्राच्या १०० मीटर परिघात प्रवेश करण्यास निर्बंध

December 13, 2025
बांधकाम मटेरियल तपासून देण्यासाठी लाच स्वीकारताना महिला अभियंत्यांसह दोघांना रंगेहात पकडले

मोठी बातमी! तलाठींच्या गैरव्यवहारामुळे मंगळवेढ्यात शेतकऱ्यांना त्रास; जिल्हाधिकाऱ्यांनी केली त्वरित निलंबनाची कारवाई

December 12, 2025
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

सोलापूर जिल्ह्यात कृत्रिम वाळू निर्मिती केंद्रे उभारली जाणार; ‘या’ तारखेपर्यंत ऑफलाइन प्रस्ताव दाखल करण्याची सूचना; शासनाने नवीन धोरण केले जाहीर

December 12, 2025
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

भामटेपणाचा कहर! सिस्टीममध्ये फेरफार करून ‘या’ परीक्षेमध्ये गुण वाढवून देण्याचे आमिष, १ कोटी १० लाख रुपये उकळले; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार; विद्यार्थी, पालकांनो सावधान

December 12, 2025
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

ग्रामस्थांनो! तालुक्यातील ‘इतक्या’ गावांची करण्यात येणार निवड; बीडीओ, विस्ताराधिकारी असणार मुक्कामी; मुख्यमंत्री राज्य अभियान समृद्ध पंचायत

December 12, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नकारात्मक बातमी! विजेचा धक्का लागून शिक्षक नेत्याचा मृत्यू; मुलीचे लग्न काही दिवसांवर आल्याने शेतातील कामासाठी काढली होती रजा

December 10, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

संतापजनक! बेकायदेशीर वाळू उपशाची माहिती देण्याच्या संशयावरून वकिलावर प्राणघातक हल्ला

December 10, 2025
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

धक्कादायक! राजा-राणीचा संसार क्षणात उद्ध्वस्त झाला; शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

December 9, 2025
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

बाबो..! सोलापूर जिल्ह्यात बँकेची ६ कोटींची फसवणूक; तीन महिलांसह ११ जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल; बँकिंग क्षेत्रात खळबळ

December 7, 2025
Next Post
प्रशांत गायकवाड यांची सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी निवड

मंगळवेढा शहरातील प्रत्येक घरातील व्यक्तीच्या लोकवर्गणीतून छत्रपतीचा अश्वरुढ पुतळा उभा केला जाईल : प्रशांत गायकवाड

ताज्या बातम्या

शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर; ‘ही’ आहेत योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

December 13, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत मतदारांचे लाड, मतांसाठी उमेदवारांनी अक्षरशः खादाडी स्पर्धाच केली सुरू; जेवणावळी, मसाला दूध.. आता पुढे काय? नागरिकांमध्ये लागली उत्सुकता

December 13, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पाटलांना राजकीय पक्षाकडून आता थेट अध्यक्षपदाची ऑफर; राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार?

December 13, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीबाबत मोठी अपडेट, निवडणूक आयोगाने निर्णय कळवला; इच्छुकांची धडधड वाढली

December 13, 2025

नागरिकांनो! ‘या’ दिवशी आठवडा बाजार राहणार बंद; मतदान केंद्राच्या १०० मीटर परिघात प्रवेश करण्यास निर्बंध

December 13, 2025
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

भरधाव वेगात आलेल्या कारने तिघांना उडवले, एकाचा मृत्यू, दोघेजण गंभीर जखमी; मंगळवेढ्यात भीषण अपघात; काळजाचा थरकाप उडवणारी बातमी; कार चालक फरार

December 12, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा