टीम मंगळवेढा टाईम्स ।
शरद पवार साहेबांशी गद्दारी करून दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरलेल्या भालके यांना जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी जहरी टीका खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली आहे.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचाराचा शुभारंभ माचनूर येथून झाला याप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, राहुल शहा, प्रथमेश पाटील, रविकांत पाटील, दत्तात्रय भोसले, रवींद्र पाटील, पंढरपूर शिवसेनेचे शहराध्यक्ष हरिभाऊ मुळे, राष्ट्रवादीचे सुभाष भोसले, अण्णा सिरसट, काँग्रेसचे फिरोज मुलाणी, संतोस रंधवे यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
खासदार मोहिते पाटील पुढे बोलताना म्हणाले की, मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघात जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती कोणी केली आहे याचा गौप्यस्फोट मी येत्या काही दिवसात करणार आहे.
भालके यांनी उमेदवारी संदर्भात प्रतीक्षा न करता पवार साहेबांचा विश्वासघात करून काँग्रेसची उमेदवारी मिळवली आहे.
देशात हुकूमशाही सरकार आले असून महिलांसाठी दिलेले पैसे सरकार दुसऱ्या बाजूने काढून देखील घेत आहे. सगळ्या बाजूने हे सरकार आपली पिळवणूक करत असल्याचे दिसत आहे. राज्यात देशात एवढी महागाई वाढवली आहे. की सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे.
नुसती घोषणा बाजी करून प्रत्येक समाजाची फसवणूक केली आहे. जाती धर्मात जातीय तेढ निर्माण करून भांडणे लावली जात आहेत. आशा सरकारला पायउतार करून जागा दाखवून देण्याची गरज आहे.
सोलापूर जिल्ह्याला हक्काचा पालकमंत्री अजून दिला नाही. प्रत्येक कार्यालयात टक्केवारी दिल्याशिवाय कामे होत नाहीत. ही कसली हुकूमशाही निर्माण केली आहे. प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार सुरू आहे हे सर्व रोखण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार आणावे असे आवाहन देखील त्यांनी केले.
सोलापूर जिल्हा हा सहकारावर उभारला आहे. शेतकरी व सभासदांच्या मालकीच्या संस्था निर्माण केल्या. विठ्ठल कारखाना अडचणीत येईल तेव्हा शरद पवार साहेबांनी मदत केली म्हणून शेतकऱ्यांच्या मालकीचा राहिला.
मंगळवेढा-पंढरपूर ही जागा राष्ट्रवादीची असताना भालके यांनी गद्दारी केली. त्यांना जनता त्यांची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही. अनिल सावंत एकनिष्ठ राहिले जेष्ठ पदाधिकाऱ्यांच्या अग्रहा खातर अनिल सावंत यांना उमेदवारी मिळाली. 2009 ची चूक जनता आता सुधारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उमेदवार अनिल सावंत बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारी मला आपली सेवा करण्यासाठी मिळाली आहे. पक्षाने व शरद पवार साहेबांनी व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठी जबाबदारी दिली आहे. मी कायम जनतेत मिसळून काम करणार आहे.
मी कुणावरही टीका करणार नाही, मी विकास करून दाखवणारा आहे, मी माझ्या कामातून विजयी मिळवून मुंबईला जाईल. व या मतदार संघातील सर्व प्रश्न मार्गी लावणार आहे.
महिलांसाठी सर्व योजना व उद्योग व्यवसाय निर्माण करण्यासाठी येणाऱ्या काळात मोठा प्रकल्प सुरू करणार असल्याचे जाहीर केले.
मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील सर्व गावातील अडीअडचणी जाणून त्या अडचणी सोडवून विकास करण्यासाठी मला संधी द्या असे आवाहन सावंत यांनी केले.
लक्ष्मण ढोबळे यांचा आमदार आवताडें वर हल्लाबोल
तीन हजार रुपये कोटीचा निधी मतदार संघात आला आहे तर कामे कुठे कुठे झाली आहेत याची माहिती द्यावी, डिजिटल बोर्ड लावावे. आता आजी आमदार यांना माजी करून घरी बसवावे असे आवाहन माजी मंत्री ढोबळे यांनी केले. सर्वसामान्य जनतेला आमदाराची भेट होत नाही असा हल्लाबोल देखील केला.
राहुल शहा बोलताना म्हणाले की, सर्वांना विश्वासात घेऊन अनिल दादा सावंत यांना उमेदवारी दिली. पूर्वीपासून हा मतदारसंघ शरद पवार यांना मानणार आहे. या दोन्ही तालुक्यात मोठ्या मताधिक्याने आपला विजय निश्चित आहे.
प्रस्तावित शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, यांनी मांडले सूत्रसंचालन शाम गोगाव यांनी केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज