mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यात प्रवास करणाऱ्या लोकांना विनापरवाना प्रवास करता येणार नाही; ‘या’ ठिकाणी असणार नाकाबंदी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 24, 2021
in सोलापूर, राज्य
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

टीम मंगळवेढा टाईम्स ।

महाराष्ट्रातील वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लागू केलेल्या संचारबंदीसह इतर निर्बंध आणखी कठोर केले आहेत.

नव्या आदेशानुसार एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करणाऱ्या लोकांना विनापरवाना प्रवास करता येणार नाही. त्याच दृष्टीने सोलापूर ग्रामीण पोलिसांनी राज्याच्या ५, तर जिल्ह्याच्या २३ अशा एकूण २८ ठिकाणी नाकाबंदी केली आहे.

शिवाय मोठ्या शहरातील प्रत्येक चौकावर पोलिसांचे विशेष लक्ष असणार असून नियम तोडणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी बोलताना दिली.

मागील काही दिवसांपासून राज्याबरोबरच सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय मृत्यू दरातही वाढ होत आहे. ही साखळी तोडण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत.

‘ब्रेक द चैन’अंतर्गत विविध आदेश पारित करण्यात आले असून त्यानुसार संपूर्ण राज्यात कडक संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा देणारी वाहने व अन्य कर्मचाऱ्यांना राज्य किंवा जिल्हा प्रशासनाकडून पासेस दिले आहेत. पासेस असतील तरच त्यांना प्रवेश दिला जाईल.

अन्यथा कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. शक्यतो नागरिकांनी प्रवास करू नये, नियमांचे पालन करावे अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक सातपुते यांनी दिला आहे.

याठिकाणी असेल कडक नाकाबंदी…

– आंतरराज्य नाकाबंदी

पोलीस ठाणे नाकाबंदी ठिकाण

मंगळवेढा – कात्राळ-चडचण (कर्नाटक राज्य)
अक्कलकोट उत्तर – वागदरी (कर्नाटक राज्य)
अक्कलकोट दक्षिण – दुधनी (कर्नाटक राज्य)
मंद्रुप -टाकळी-नांदणी, सादेपूर (कर्नाटक राज्य)

आंतरजिल्हा नाकाबंदी

पोलीस ठाणे नाकाबंदी ठिकाण

मंगळवेढा -सोड्डी-उमदी (सांगली)

टेंभुर्णी – भीमानगर (पुणे)
अकलूज – सराटी (पुणे)
नातेपुते -शिंगणापूरपाटी (सातारा)
सोलापूर तालुका – बोरामणी, तामलवाडी (उस्मानाबाद)
पांगरी – येडशी, पिंपळवाडी येरमाळा (उस्मानाबाद)
करमाळा – जातेगाव (अहमदनगर), कोंढार -चिंचोली-राशीन (अहमदनगर), आवाटी ते परंडा (उस्मानाबाद)
माळशिरस – पिलीव, जळभावी घाट (सातारा), सांगोला -जुनोनी, शेरेवाडी-कटफळ, जत ते सानंद (सांगली).

कुर्डूवाडी – लव्हे ते परंडा, मुंगशी ते परांडा (उस्मानाबाद)
वैराग -गौडगाव, धामणगाव ते काटी (उस्मानाबाद)
बार्शी तालुका – वारदवाडी (उस्मानाबाद)
————

प्रत्येक चौकावर असणार विशेष लक्ष

ग्रामीण भागातील बार्शी, पंढरपूर, करमाळा, माढा, अक्कलकोट, मोहोळ, सांगोला, मंगळवेढा आदी मोठ्या शहरातील प्रत्येक महत्त्वाच्या चौकात पोलिसांचा विशेष बंदोबस्त असणार आहे.

नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय गाडीही जप्त करण्याचे आदेश देण्यात आल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

कोरोनाला हरविण्यासाठी प्रशासनाकडून कडक नाकाबंदीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी कडक संचारबंदीमधील सर्व नियमांचे पालन करावे. अत्यावश्यक सेवेतील लोकांशिवाय कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये.

ADVERTISEMENT

परराज्य व परजिल्ह्यातून येणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. कोरोनाला संपविण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.- तेजस्वी सातपुते,पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: नाकाबंदीसोलापूर
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

दहावी बारावी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना, परीक्षेला उशीरा याल तर परीक्षेला मुकाल; यावर्षी असणार असे बदल

February 2, 2023
धक्कादायक! पंढरपुरात तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा; होऊ लागला मळमळ-उलटीचा त्रास

धक्कादायक! पंढरपुरात तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा; होऊ लागला मळमळ-उलटीचा त्रास

February 2, 2023
अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

February 1, 2023
बजेटमधून दिलासा! तुम्हाला टॅक्समध्ये 7 लाखांपर्यंत सूट कशी मिळणार? हे समजून घ्या नाहीतर होईल नुकसान

बजेटमधून दिलासा! तुम्हाला टॅक्समध्ये 7 लाखांपर्यंत सूट कशी मिळणार? हे समजून घ्या नाहीतर होईल नुकसान

February 1, 2023
गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

January 31, 2023
सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

January 30, 2023
शेतकऱ्यांन समोर पुढचे काही तास अवकाळी पावसाच संकट! ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट

शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यात ‘या’ दोन दिवसांत पावसाचा अंदाज; हवामान विभागानं वर्तवली शक्यता

January 28, 2023
महाराष्ट्राच्या जवळची व्यक्ती होणार नवी राज्यपाल; ‘या’ नावाचीही आहे चर्चा

महाराष्ट्राच्या जवळची व्यक्ती होणार नवी राज्यपाल; ‘या’ नावाचीही आहे चर्चा

January 28, 2023
शरद पवार आज व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून मंगळवेढेकरांशी साधणार संवाद

मोठी बातमी! शरद पवार तब्बल नऊ वर्षानंतर मंगळवेढा दौऱ्यावर; आज ‘या’ सोहळ्यास उपस्थित राहणार

January 28, 2023
Next Post
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

बारामतीकरांचे झाले! आता इंदापूरकरांनी पळविले सोलापूरकरांचे पाणी; पालकमंत्र्यांच्या इंदापूरसाठी उजनीतून पाच टीएमसी पाणी

ताज्या बातम्या

बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

दहावी बारावी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना, परीक्षेला उशीरा याल तर परीक्षेला मुकाल; यावर्षी असणार असे बदल

February 2, 2023
धक्कादायक! पंढरपुरात तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा; होऊ लागला मळमळ-उलटीचा त्रास

धक्कादायक! पंढरपुरात तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा; होऊ लागला मळमळ-उलटीचा त्रास

February 2, 2023
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

मंगळवेढ्यात ‘या’ मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये नोकरीची संधी, घडवा एक लखलखते करियर; आजच करा अर्ज

February 2, 2023
दामाजी कारखान्याकडून अँडव्हान्स ऊसबिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा; ‘हा’ प्रकल्प उभारण्यात येणार

आला उन्हाळा! अमर इलेक्ट्रॉनिक्स आयोजित AC सर्विस कैम्प, A.C. कोणताही असो, कोठूनही घेतला असो सर्विस आम्ही देणार; तेही 50% डिस्काउंट सहित; संपर्क:-9975786514

February 2, 2023
शिवशंभो कलेक्शन आता नवीन जागेत; दिवाळी निमित्त खरेदीवर 10 टक्के डिस्काउंट

मंगळवेढ्यात कपड्यांचा अनोखा मॉल; 10 हजारांच्या खरेदीवर अनामिका क्लॉथ सेंटरकडून पाच हजारांची खरेदी मोफत

February 2, 2023
उत्सुकता संपली! दामाजी कारखान्याच्या अध्यक्षपदी शिवानंद पाटील तर उपाध्यक्षपदी ‘हे’ नाव निश्चित; आज होणार शिक्कामोर्तब

दामाजी कारखान्याकडून अँडव्हान्स ऊसबिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा; ‘हा’ प्रकल्प उभारण्यात येणार

February 2, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..