टीम मंगळवेढा टाईम्स ।
जनजागरण मोहिमेला सहकार्य करा. टेस्टींग वाढविणे आवश्यक आहे. लस न घेतलेल्या लोकांकडून गावाला धोका आहे. ५ लाखांपेक्षा अधिक लोकांना लस घेतली नाही, असे सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
मोहोळ तालुक्यांतील शिरापूर येथे “मी सुरक्षित.. माझे गाव सुरक्षित” या अभियानाचा शुभारंभ सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे हस्ते करणेत आले. या प्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी गटविकास अधिकारी गणेश मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी जगताप, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव , ग्रामसेविका ए एस भालशंकर, मुख्याध्यापक साबळे, डाॅ. पाथरूडकर , शिरापूरच्या सरपंच विजया जनार्दन ताकमोगे उपस्थित होते.
या कार्यक्रमनंतर सिईओ दिलीप स्वामी यांनी शिरापूर आरोग्य केंद्राचा पाहणी केली. त्यानंतर जन संजीवनी अभियान ची अंमलबजावणी बाबत सुचना दिल्या.
कोरोनाबरोबर खेळू नका, बचाव करा : सीईओ स्वामी
कोरोनाबरोबर खेळू नका. कोरोनापासून बचाव करणेसाठी कुटूंब व गाव सुरक्षित ठेवा. चांगले तब्येत असलेले लोक कोरोनामुळे गेले आहे.
मी स्वत कोरोनाला सामोरे गेलो आहे. त्यातून आले आहे. काय नुकसान होते. शारिरिक, मानसिक, आर्थीक नुकसान कोरोनामुळे झाले आहे. जबाबदार त्रिसुत्रीची पालन करा.
मी सुरक्षित राहणार याची जबाबदारी घ्या. हे आपल्यासाठी आहे. दुसरे साठी नाही, असेही दिलीप स्वामी यांनी सांगितले.
ग्रामस्तरीय दक्षता समिती, स्थानिक कर्मचारी व पदाधिकारी बैठक, कोरोनाचे पार्श्वभूमीवर टेस्टिंग, ट्रेसिंग, दुकानदार व स्थानिक व्यापारी यांच्याशी चर्चा, त्रिसुत्रीचे पालन करणेसाठी गावकरी यांना शपथ द्या.
सीईओ स्वामी झाले भावनिक.
मी स्वत कोरोनामधून गेलो आहे. कोरोना झालेवर काय अवस्था होते मी ते अनुभवले आहे. काळजी घेणे हेच सुरक्षितता आहे. कोरोना मुळे किती नुकसान होते.
आपण सर्वानी अनुभवले आहे. लस का घेत नाही. दोन डोस घेतले लोकांना पण कोरोना होतो मात्र जीवाला धोका नाही. मात्र ज्यांनी लस घेतली नाही त्यांना दवाखानेत दाखल करावे लागत आहे. अडीच लाख लस पडून आहे. लोकांनी पुढे यायला पाहिजे, असेही सांगून ते भावनिक झाले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज