मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क ।
लाल व काळ्या कंपनीत पैसे डबल करुन देतो अशी खोटी बतावणी करुन फोन पे च्या माध्यमातून 5 लाख 70 हजार घेवून बँक खात्यात पैसे नाहीत अशा बँकेचा चेक देवून
आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी प्रियांका बाबू लोहार (रा.हुलजंती) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला असून अधिक चौकशीसाठी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेची हकीकत अशी, यातील फिर्यादी वैभव अनिल जमादार (वय 25) यांचे मेडिकल असून दि.1 जुलै 2022 ते 10 जून 2023 या दरम्यान हुलजंती येथील महिला आरोपी प्रियांका बाबू लोहार हिने
सोलापूर येथील लाल व काळ्या कंपनीत पैसे डबल करुन देते अशी खोटी बतावणी करुन फिर्यादीकडून 1 लाख 80 हजार फोन पे च्या माध्यमातून तसेच फिर्यादीची पत्नी हेमा जमादार यांच्याकडून रोख 2 लाख रुपये
फिर्यादीची आई सुनंदा यांच्याकडून 1 लाख 90 हजार रुपये असे एकूण 5 लाख 70 हजार रुपये घेवून दिलेल्या रकमेच्या डबल रक्कम टाकून सही करुन जिल्हा मध्यवर्ती बँक सोलापूर येथील चेक सही करुन दिला.
मात्र सदर बँकेत जावून चौकशी केली असता त्या अकाऊंटला शिल्लक रक्कम नसल्याचे समजले. वैभव जमादार प्रमाणेच गावातील इतर लोकांचीही दिशाभूल करुन बँक खात्यामध्ये पैसे नाहीत अशा बँकेचा चेक देवून
आर्थिक फसवणूक करुन गाव सोडून पळून गेल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले असून याचा अधिक तपास प्रभारी पोलीस अधिकारी नयोमी साटम ह्या करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज