मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
राज्यातील तरुणाई मध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या गौतमी पाटील यांच्या लावणी कार्यक्रमासाठी घेरडी (ता. सांगोला) येथील पठ्याने चक्क १०६ पोलिसांचा सशुल्क बंदोबस्त तैनात करून संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले.
गौतमी पाटीलच्या नुसत्या नावानेच प्रचंड गर्दी जमते. दरम्यान, या गर्दीत राडा होऊन कार्यक्रमात व्यत्यय येऊ नये म्हणून १०० पोलीस कर्मचारी आणि ६ अधिकारी अशा १०६ पोलिसांच्या बंदोबस्तांसाठी घेरी येथील राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी असणाऱ्या सोमा मोटे यांनी तब्बल ५ लाख रुपये मोजले आहेत.
शुक्रवार दि. १९ रोजी घेरडी येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे सरचिटणीस सोमा मोटे यांच्या वाढदिवसानिमित्त रात्री या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सांगोला व जत तालुक्यातील हजारो प्रेक्षक उपस्थित होते.
संपूर्ण राज्यभर गौतमी पाटील तुफान लोकप्रिय होऊ लागली आहे. यापूर्वी सांगोला तालुक्यातील चोपडी, महुद सह अन्य भागात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रचंड गर्दी जमली होती.
या गर्दीत झालेल्या राड्यामुळे संयोजकांना कार्यक्रम अर्ध्यावर थांबवावा लागला होता. महुद येथे तर भर कार्यक्रमात प्रचंड गोंधळ झाल्याने दोन गटात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
आणि गौतमी पाटीलने कार्यक्रम अर्ध्यावर सोडून कशीबशी आपली सुटका करून घेतली होती. हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहचले होते. याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
सांगोला तालुक्यातील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात वाईट अनुभव असल्याने घेरडी येथील कार्यक्रमात असा कोणताही प्रकार घडू नये म्हणून आधीच कार्यक्रमाचे संयोजक सोमा मोटे यांनी सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्याकडे
सदर कार्यक्रमासाठी तब्बल पाच लाख रुपयांचे शुल्क भरून १०० पोलीस कर्मचारी आणि १ पोलीस उपनिरीक्षक, ४ सहाय्यक पोलीस निरीक्षक व १ पोलीस निरीक्षक असे सहा अधिकारी असा एकूण १०६ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात केला होता.
गौतमी पाटीलच्या राज्यभरातील कार्यक्रमांना होणारी गर्दी नेहमीच चर्चेचा विषय बनलेली असते.
परंतु राज्यात प्रथमच कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी १०० हून अधिक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा फौजफाटा घेरडी येथे तैनात केल्याने घेरडी गावाला अक्षरशः पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार नाही
सांगोला तालुक्यात यापूर्वी गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात काही प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. हा अनुभव पाठीशी होता, त्या अनुषंगाने संयोजकांनी घेरडी येथील कार्यक्रमासाठी ५ लाख इतके शुल्क भरून १०० पोलीस कर्मचारी आणि ६ अधिकारी असा बंदोबस्त मागवला होता.
त्यानुसार त्यांना बंदोबस्त देण्यात आला होता. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कार्यक्रमात कुठेही अनुचित प्रकार किंवा गोंधळ घडला नाही. – अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक, सांगोला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज