टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ गावचे ग्रामदैवत सिद्धनाथ या मंदीराची देऊळ पड जागा त्या गट नंबर च्या वहिवाटी दाराने सातबारा वरील मंदिराची जागेची नोंद कमी करून स्वतःच्या जमिनीमध्ये समावेश करून
मंदिर व परिसराची दोन एकर जमीन ही स्वतःच्या मालकीची सांगत असल्याने या घटनेचा निषेध म्हणून आज पाटकळ गाव कडकडीत बंद होते.
ग्रामदैवत सिद्धनाथाच्या मंदिराचे बांधकाम गावकऱ्यांनी वेळोवेळी करून साधारण दोन कोटी रुपये किमतीचे बांधकाम लोकवर्गणीतून केलेले आहे.
तसेच या मंदिराची दोन एकर जागा देऊळ पड अशी सातबारा उताऱ्यावर नोंद असताना गावकऱ्याच्या परस्पर त्या गटामध्ये संपूर्ण गटामध्ये वहिवाटीदाराने देऊळ पड अशी नोंद कमी करून स्वतःचे नाव नोंद केलेले आहे.
तसेच हे मंदिर माझ्या मालकीचे असल्याचे सांगत आहे. स्वतःच्या एकाच कुटुंबातील लोकांची नावे घेऊन धर्मदाय संस्था स्थापन केलेली आहे व मंदिरावर अधिकार असल्याचे डिजिटल बोर्ड लावून
या सार्वजनिक जमिनीवर व्यक्तिगत हक्क सांगत आहे. याचा निषेध म्हणून पाटकळ गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे दाद मागितली आहे.
यासाठी गावच्या दीड हजार लोकांच्या सह्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले आहे.
तसेच आज सिद्धनाथ भक्तांची ग्रामसभा घेऊन या घटनेचा निषेध केलेला आहे. यावेळी पाटकळ गावचे पाचशेहून अधिक लोक एकत्र येऊन निषेध सभा घेण्यात आली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 997076626
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज