मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । भाजपाने आज महाराष्ट्र कार्यकारिणी जाहीर केली आहे. याविषयीची जी पत्रकार परिषद होती त्यात चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. पंकजा मुंडे यांना केंद्रातली जबाबदारी दिली जाईल असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. नवीन भाजपा महाराष्ट्र टीमचे अभिनंदन माझ्याविषयीची भूमिका जाहीर केल्याबद्दल मी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आभार मानते असा ट्विट पंकजा मुंडे यांनी केला आहे. Pankaja Munde gave ‘this’ reaction to the new BJP executive
नवीन @BJP4Maharashtra टीम चे अभिनंदन… माझ्या विषयीची भूमिका जाहीर केल्या बद्दल प्रदेशाध्यक्ष @ChDadaPatil यांचे आभार!
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) July 3, 2020
भाजपाच्या नव्या कार्यकारिणीत पंकजा मुंडे यांना स्थान न दिल्याने बऱ्याच उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या.मात्र आता पंकजा मुंडे यांनीच याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नव्या कार्यकारिणीतल्या सदस्यांचे अभिनंदन केलं आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांचेही त्यांनी आभार मानले आहेत.
पंकजा मुंडे यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान नसलं तरीही केंद्राच्या कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल. भाजपाच्या नेत्या प्रीतम मुंडे आणि भाजपाच्या नेत्या रक्षा खडसे या दोघीही खासदार आहेत. त्यांच्या कामामुळे त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे नाराज आहेत म्हणून त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे असं मुळीच नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. दरम्यान माझ्याबद्दलची भूमिका चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केली त्यामुळे त्यांचेही मी आभार मानते असंही पंकजा मुंडे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज