टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर अर्बन बँक ही शंभर वर्षाहून वर्षा पासून कार्यरत आहे. नागरिकांचा विश्वास व आर्थिक आधार म्हणून या संस्थेकडे बघितले जाते.
यामुळे या बँकेवर टीका न करता माझ्यावर वैयक्तिक राग असेल तर खुशाल आरोप करा, असा टोला माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी बँकेच्या निवडणुकी संदर्भात आयोजित बैठकीमध्ये विरोधकांना लगावला.
दि पंढरपूर अर्बन को. ऑप. बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे. या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी येथील पांडुरंग भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जेष्ठ नेते दिनकर मोरे, दाजी भुसनर, बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, सोमनाथ भिंगे, लक्ष्मण धनवडे, , रजनीश कवठेकर, बाबासाहेब बडवे यांच्यासह डॉक्टर, वकील व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
अर्बन बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर विरोधकांनी समविचारी आघाडी स्थापन केली आहे. बँकेबाबत विविध आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. यावर प्रशांत परिचारक यांनी विरोधकांचे नाव न घेता त्यांच्या आरोपांना उत्तर दिले.
कोविड महामारीमुळे रस्त्यावरील टपरीचालकापासून आर्थिक महासत्ता असणाऱ्या देशांनादेखील फटका बसला. देशभरातील बँकाची कर्ज थकीत होती. याचा अर्थ असा होत नाही की बँक डबघाईस आली आहे.
पंढरपूर अर्बन बँकेत सव्वालाख खातेदारांचे पैसे आहेत. त्यांचा बँकेवर ठाम विश्वास आहे. स्व.सुधाकरपंत परिचारक यांनी घालून दिलेल्या वाटेवरच आम्ही काम करीत असल्याचे परिचारक यांनी सांगितले.।
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज