टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर येथील एका व्यापाऱ्याला दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करून दीड लाख रुपयांचे सोने लंपास केले. नवीन कराड नाका मशिदीजवळ ही घटना घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , अशोक प्रताप गांधी (वय ६२,रा.वीरसागर नगर ,पंढरपूर) हे नवीन कराड नाका मशिदीजवळ आले होते. त्यावेळी एका इसमाने त्यांना हात करून थांबवले.
त्याने पोलीस असल्याचे भासवून दुसऱ्या एका इसमाची बॅग चेक केली.तसेच स्कूटीच्या डिकीत गांधी यांच्या अंगावरील ९० हजार रुपये किमतीचे तीन तोळे वजनाची सोन्याची चेन व ६० हजार रुपये किमतीच्या एक तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या ठेवण्यास सांगितल्या.
आणि गांधी यांची नजर चुकवून सोन्याचे दागिने काढून घेतले.दोघे पोलीस स्टेशनला ये म्हणून पळून गेले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी करे करत आहेत.
Pandharpur Pretending to be a policeman, a trader stole Rs 1.5 lakh worth of jewelery
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज