टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर शहरातील कुंभार गल्ली येथील 21 वर्षीय विवाहितेचा धारदार शास्त्राने वार करून खून केला आहे. आज शुक्रवारी पहाटे 4 च्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी पतीस ताब्यात घेतले आहे. ( Pandharpur Murder of wife on suspicion of character )
पंढरपूर शहरातील कुंभार गल्ली भागात शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास निकिता आकाश पवार या विवाहितेचा पोटावर धारदार शास्त्राने वार करून खून केला आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सागर कवडे, शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार घटनास्थळी पोहोचले आहेत.
चारित्र्याच्या वर संशय घेऊन पतीने पत्नीचा खून करून पती स्वतःहुन पोलीस स्टेशनला हजर झाला. निकिता आकाश पवार (वय 21 ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत पंढरपूर पोलीस स्टेशन कडून मिळालेली माहिती अशी की, कुंभार गल्ली येथील रहिवाशी आकाश पवार (वय 23) याचे पाच महिने पूर्वी निकिता बरोबर लग्न झाले होते.
आकाश याने निकिताच्या चरित्रावर संशय घेऊन मध्यरात्री निकिताचा खून करून स्वतः हुन सकाळी 6 वाजता पोलीस स्टेशनला हजर झाला आहे. पतीने पत्नीचा खून केलेमुळे कुंभार गल्ली परिसरात खळबळ उडाली आहे.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज