टीम मंगळवेढा टाईम्स । गेले सहा महिन्यांपासून पंढरपूर नगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी कोरोना संक्रमण काळात पंढरपूरकर नागरिकांची सेवा करीत असून स्वताःच्या जिवाची पर्वा न करीता ही सेवा आहोरात्र चालु आहे , अशा कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्यास त्यांना एक लाख रूपये देण्याचा निर्णय नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांनी घेतला आहे.
पंढरपूर नगरपरिषदेची स्थायी समितीची सभा संपन्न झाली. या सभेमध्ये पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी सुनील वाळूजकर व सह कार्याध्यक्ष शरद वाघमारे यांनी नगरपरिषदेचे संवर्ग , आरोग्य कर्मचारी , नगरपरिषद रुग्णालयातील कर्मचारी , सर्व लिपिक शिपाई , सर्व विभाग प्रमुख गेल्या पाच महिन्यापासून कोरोना विरुद्धची लढाई लढत आहेत.
यामध्ये काम करत असताना चार कर्मचारी पॉझिटिव्ह झाले होते व भविष्यात सुद्धा कर्मचारी पॉझिटिव्ह होण्याची शक्यता आहे. शासनाने नगरपरिषद कर्मचाऱ्यांना विमा देण्याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.
त्यामुळे नगरपरिषदेने कर्मचाऱ्यांचा कोरोना कवच हा विमा उतरावा किंवा त्यांना उपचारासाठी एक लाख रुपये पर्यंतचा खर्च देण्यात यावा , अशी मागणी नगराध्यक्षा भोसले व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर , सर्व स्थायी समिती सदस्य यांना केली होती.
यास अनुसरून मुख्याधिकारी यांनी हा प्रस्ताव स्थायी समितीच्या समोर शिफारशीसह ठेवला. बुधवारी झालेल्या स्थायी समिती सभेमध्ये निर्णय घेण्यात आला.
या सभेस नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले,स्थायी समिती सदस्य दगडू धोत्रे , वामनराव बंदपट्टे , उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, पक्षनेते गुरुदास अभ्यंकर , आरोग्य समितीचे सभापती विवेक परदेशी, रेहाना बोहर , रेणुका धर्मराज घोडके यांनी या विषयाला एकमताने मंजुरी दिली.
या निर्णयामुळे नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Pandharpur municipality will provide Rs one lakh for the treatment of Corona positive employees
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज