टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाच्या आपत्तीच्या काळात गावात गर्दी जमवून आदेशाचे उल्लंघन करून साथीचे रोगाचा फैलाव होईल याची कल्पना असतानाही जाणीवपुर्वक बोकड कापून जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रकरणी तो कैदी, दोन निलंबित पोलिस व पार्टीच्या आयोजकासह आंबे (ता पंढरपूर) येथील जेवण पार्टीस हजर असणाऱ्या ३० ते ४० जणांवर पंढरपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात शिवाजी बळीराम भोसले यांनी जेवणाची पार्टी आयोजित केली होती सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग असताना शासकीय आदेशाचे उल्लंघन करून साथीच्या रोगाचा फैलाव होईल याची कल्पना असताना सुद्धा जाणीवपूर्वक बोकड कापून जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला.
हा कार्यक्रम सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यत सुरू होता या पार्टीस गावातील ३० ते ४० नागरिक उपस्थित होतें त्याचबरोबर सबजेलमध्ये अटकेत असलेला तानाजी बळीराम भोसले यास मंगळवेढा पोलीस ठाण्याचे जेलमधील ड्युटी वरील कर्मचारी बजरंग माने व उदय ढोणे यांनी पार्टीस आणले.
त्यामुळे. भा.द.वी कलम १८८,२६९, २७० सह आपत्ती व्यवस्थापन २००५ चे कलम ५१(ब) , भारतीय साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ चे कलम ३(१) (अ), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे त्या कैद्यासह दोन निलंबित पोलीस व पाटीर्चे आयोजन करणाऱ्या शिवाजी बळीराम भोसले याच्यावर पंढरपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची फिर्याद आंबे गावचे तलाठी प्रकाश तानाजी गुजले यांनी दिली त्यानुसार पुढील तपास पंढरपूर पोलीस करीत आहेत.
आंबे गावातील जेवणाच्या पार्टी प्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे़ कोरोनाच्या आपत्ती काळात शासकीय आदेशाचे उल्लंघन करून साथीच्या रोगाचा फैलाव होईल याची कल्पना असताना सुद्धा जाणीवपूर्वक बोकड कापून जेवणाचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या पार्टी संयोजकासह दोन निलंबित पोलीस व जेवण पार्टीस हजर असणाऱ्या ३० ते ४० जणांवर पंढरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े़ पोलिस खात्यास न शोभणारे कृत्य करून कर्तव्यात कसूर करणाऱ्यांची गय केली जाणार नाही-अतुल झेंडे,अतिरिक्त पोलीस अधीक्षक (सोलापूर ग्रामीण)
—————————
???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज