टीम मंगळवेढा टाइम्स ।
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीअगोदर दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबीतील उमेदवारीला राष्ट्रवादी काँग्रेस मधूनच विरोध करणाऱ्या विद्यार्थी सेवकाला आज उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या बैठकीत मारहाण झाली आहे.
विद्यार्थी सेवक किरण घोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून भालके कुटुंबीयांना उमेदवारी न देण्याची मागणी केली होती.
भालके गटाचे वर्चस्व असणाऱ्या विठ्ठल कारखान्याचे कामगार वेतन व शेतकऱ्यांची देणी थकली असल्याने विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी न देण्याची मागणी केली होती.
याचाच मनात राग धरून 15 ते 20 जणांनी किरण घोडके याना आयोजित बैठकी दरम्यान मारहाण झाली आहे.किरण घोडके याच्या परस्पर कर्ज घेतले आहे याची तक्रारी संदर्भात अजित पवारांना भेटायला आल्यानंतर हा मारहाणीचा प्रकार घडला आहे.
राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांकडून विरोध होत असल्याने भगीरथ भालके यांच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित आणि प्रदेशाध्यक्ष जयंत यांच्या सभेतच केली जबरदस्त मारहाण
नेमकं काय आहे प्रकरण
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीअगोदर दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबीतील उमेदवारीला राष्ट्रवादी काँग्रेस मधूनच विरोध.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक युवराज पाटील यांनी विरोध केल्यानंतर विद्यार्थी सेवक किरण घोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून भालके कुटुंबीयांना उमेदवारी न देण्याची केली मागणी.
भालके गटाचे वर्चस्व असणार्या विठ्ठल कारखान्याचे कामगार वेतन व शेतकऱ्यांची देणी थकली असल्याने विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी न देण्याची केली मागणी.
काही दिवसांपूर्वी विठ्ठल कारखान्याच्या कामगार आणि सभासदांनी काळा दिवस पाळून निषेध केला असतनाच राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांकडून विरोध होत असल्याने भगीरथ भालके यांच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा सुरू झाली होती.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज