मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । ऐन आषाढी वारीच्या तोंडावर सुरू झालेले कोरोनाचे सत्र पंढरपूरात थांबता थांबेना आज सकाळी पंढरपूर शहर व तालुक्यासाठी आजच्या दिवसाची सुरुवात चिंता वाढवणारी ठरली आहे. रात्री उशिरा मिळालेल्या अहवालानुसार पंढरपूर शहरात 3 तर करकंब येथे 2 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
रविवारी दिवसभरात प्राप्त झालेले सर्वच 53 अहवाल निगेटिव्ह आले होते. तर आणखी 71 अहवाल येण्याची प्रतीक्षा होतीे. त्यापैकी रात्री उशिरा 12 अहवाल मिळाले असून त्यातील 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.
यामध्ये पंढरपूर शहरातील 3 जणांचे तर करकंब येथील 2 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील एकूण कोरोना बाधीतांची संख्या 27 झाली आहे. अद्यापही 59 जणांचे अहवाल येणे बाकी आहेत. त्यापैकी 6 जणांचे swab तपासणीसाठी परत मागवण्यात आलेले आहेत असे समजते.
पंढरपूर शहरातील एका बँकेच्या संचालकांचा मुलगा आजच्या पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या मध्ये आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे त्यांच्या संपर्कातील इतरांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.उर्वरित 59 आणि नव्याने swab मागवलेल्या 6 जनांसह 65 अहवाल येणे अपेक्षित आहे. त्याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Pandharpur City corona found Monday 3, Karkamb 2 Positive, Total Patients 27
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज