मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापूर जिल्ह्यातील अनाथ मुलांचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी भारतीय जैन संघटना जिल्ह्यातील ३० विद्यार्थ्यांचे पालकत्व घेणार आहे.
पाचवीपासून १२ वीपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य केतन शहा यांनी केले.
यावेळी शहा म्हणाले, विद्यार्थ्याच्या आई, वडील यापैकी एक किंवा दोघांचे निधन कोविडने किंवा शेतकरी आत्महत्या असलेल्या अनाथ मुलांना मोफत शिक्षण देणार आहे.
सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी, सहावीमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांना १२ वीपर्यंतचे शिक्षण, निवास, भोजन, शिक्षण साहित्य, आरोग्य तपासणी आणि औषधे मोफत देण्यात येणर आहेत.
ही सोय पुणे जिल्ह्यातील वाघोली पुनर्वसन प्रकल्प येथे असणार आहे. पाचवीसाठी ५० आणि सहावीसाठी ३० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी प्रा. सुरेश साळुंखे (७७२२०१८५८६), सविता सुतार (९८६०१०५३२६) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातून 30 विद्यार्थी निवडणार : साळुंखे
मुलांच्या प्रवेशासाठी एक अट असून, आई किंवा वडील यापैकी एकाचा किंवा दोघांचा मृत्यू कोविड किंवा शेतकरी आत्महत्या असावी. जिल्ह्यातून ३० विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात.
जात, धर्म, पंथ याचे बंधन नाही. पालकांचे संमतीपत्र व कागदपत्राच्या साक्षांकित प्रति असाव्यात, असे प्रा. सुरेश साळुंखे यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज