टीम मंगळवेढा टाईम्स ।
विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकी ज्ञानाबरोबरच सामान्यज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षण सप्ताह राबवण्यात येत आहे. या सप्ताहात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, तंत्रज्ञान विषयक उपक्रमाबरोरच लोकसहभागातून शाळेत नवोपक्रम घेण्यात येणार आहेत.
आज दि.२२ ते २८ जुलैदरम्यान हा शिक्षण सप्ताह राबवला जाणार आहे. शाळेत सात दिवसात प्रत्येक दिवशी नवी संकल्पना घेऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांमधील कलागुण वृद्धिंगत करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त हा शिक्षण सप्ताह घेण्यात येणार आहे.
हा सप्ताह सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या शाळांत राबवणे बंधनकारक आहे. प्रत्येक केंद्रातून एका नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त उपक्रम, ज्ञानवृद्धीसाठी होणार उपयोग
पहिल्या दिवशी
प्रत्येक शाळेत स्तर वर वर्ग निहाय साहित्य तयार करून त्याचे प्रदर्शन भरविले जाणार असून यामध्ये घोषवाक्य असलेले पोस्टर तयार करणे, गणित व विज्ञान या विषयांवर कोडी तयार करणे, विज्ञान, गणित व भाषा या विषयांशी संबंधित खेळणी, गोष्टी कार्ड बनवणे, ऐतिहासिक कालखंड, सणावळ्या यांचे भिंतीवरील तक्ते बनवले जाणार आहेत.
दुसऱ्या दिवशी
शालेय परिपाठादरम्यान भाषिक खेळ खेळ पुस्तिका, जादुई गणित यामध्ये दिलेले खेळ घेण्यात येणार आहेत.
तिसऱ्या दिवशी :
शाळेच्या पहिल्या सत्रात एक ते दोन तासात विद्याथ्यांसाठी विविध स्वदेशी खेळांचे तसेच खेळांच्या स्पर्धा आयोजन करण्यात येणार आहेत. यात पालक व नागरी समाज, शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्य यांचाही सहभाग घेतला जाणार आहे.
चौथ्या दिवशी
शाळांमध्ये विविध भाषा, वेशभूषा, खाद्य पदार्थ, कला, वास्तुकला, चित्रकला, नृत्य, गाणी, नाट्य, लोक व पारंपरिक कला, पथनाट्य, कथाकथन यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्थानिक, पारंपरिक कलाकार यांना शाळेत त्यांची कला प्रदर्शित करण्यासाठी आमंत्रित करून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे.
पाचव्या दिवशी:
शाळेत सर्व प्रकारचे शालेय अॅप तसेच चॅनल याचा प्रचार व प्रसार करण्यात येणार असून, शिक्षणाविषयी विद्याध्यर्थ्यांना विविध चॅनलची ओळख करून देणे, शैक्षणिक व्हिडीओ तयार करणे आदी उपक्रम राबवले जाणार आहेत.
सहाव्या दिवशी
प्रत्येक इयतेतील ४ ते ५ विद्यार्थी घेत इको क्लब स्थापन करत वृक्षारोपण मोहिम, अंतर्गत शालेय परिसर, घर, सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक शाळेने ३५ रोपे लावायची आहेत. विद्यार्थी व त्यांच्या मातांचा सक्रिय सहभाग घेत त्यांच्या नावाची नेमप्लेट बनवून रोपांचे संगोपनाची जबाबदारी देणार.
सातव्या दिवशी :
विद्यांजली पोर्टलवर शाळांची नोंदणी करणे, शाळेस मदत करणाऱ्या स्वयंसेवकांची नावे फलकावर लिहिणे, समाजात विद्यांजली कार्यक्रमाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रभात फेरी काढणे, पथनाट्य, पोस्टर, घोषवाक्य स्पर्धा आयोजित करणे.
सात दिवसात सात नवे उपक्रम
सोमवार : अध्ययन अध्यापन साहित्य दिवस., मंगळवार : मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस. बुधवार : क्रीडा दिवस. गुरुवार : सांस्कृतिक दिवस. शुक्रवार : कौशल्य व डिजिटल दिवस. शनिवार : इको क्लब उपक्रम. रविवार : समुदाय सहभाग दिवस.(स्रोत:दिव्य मराठी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज