टीम मंगळवेढा टाईम्स ।
भाजपाच्या जाहीरनाम्यात तीन कोटी लोकांना घर देण्याचा आश्वासित केले आहे. मात्र गेल्या निवडणुकीच्या दरम्यान दिलेल्या याच आश्वासनाचे काय झाले? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. ईडी लावा आणि पक्षात घ्या हा अनोखा कार्यक्रम ते राबवत आहेत.
भ्रष्टाचारी व्यक्तीला पक्षात घेऊन आपण आपल्याच पक्षाची प्रतिमा मलीन करत आहोत. इतका सर्वसामान्य विचार करण्याची कुवत देखील यांच्यात नाही. नरेंद्र मोदी साहेबांनी एक घोषणा केली आणि आपला पक्ष स्वच्छ झाला.
कधी कुठे पंतप्रधान मोदी साहेबांची भेट झाली तर यासाठी नक्कीच त्यांचे आभार मानणार असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला चांगलाच टोला लगावला.
माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ टेंभुर्णी, माळशिरस येथे जाहीर सभा पार पडली. त्यावेळी जयंत पाटील बोलत होते.
पुढे बोलतांना जयंत पाटील म्हणाले की, “जेव्हा राज्यसत्ता धर्मसत्तेच्या अधीन होते तेव्हा विकास मंदावतो आणि याचा परिणाम घरोघरी जाणवतो. इलेक्ट्रॉल बाँडच्या माध्यमातून कंपन्यांकडून खंडणी गोळा करण्याचे काम भाजपने केले. ‘ना खाने दूंगा’ म्हणणाऱ्यांनी खाण्याचा नवीनच मार्ग शोधला.
आम्ही निवडून आल्यानंतर जातनिहाय जनगणना करू. प्रत्येक समाजाची लोकसंख्या पाहून त्याप्रमाणे त्यांना आरक्षण देऊ. कायद्यात ५०% आरक्षणाची जी अट आहे, ती दुरुस्त करून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करू ही भूमिका काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात घेतलेली आहे.
असं म्हणत सामान्य माणसं तुतारीच्या प्रचाराला स्वतः मैदानात उतरली आहे. “पक्ष सोडून गेलेल्यांचं काय घोडं अडलय हे आम्हाला माहिती आहे, आम्ही मात्र पवार साहेबांसोबतच” असं ठामपणे लोक सांगतायत. असेही जयंत पाटलांनी सांगितलं.
दरम्यान, छत्रपती शाहू महाराज यांनी मांडलेल्या आरक्षणाच्या संकल्पनेनंतर त्यामुळे मागासलेल्यांना पुढे येण्याची संधी मिळाली. शिक्षण समाजात अमुलाग्र बदल घडवून आणू शकतो हे फुले दांपत्यांनी अधोरेखित केले.
आपल्या सर्व विचारवंतांचे विचार एका चौकटीत आणण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून केले. मात्र त्यापासून देश भरकटताना दिसतो आहे. असेही ते म्हणाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज