अॅमेझॉन सेलमध्ये लाखो लोकांनी कमी किंमतीत स्मार्टफोन्स, टीव्ही, कपड्यांसह अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स खरेदी केले. परंतु, दिल्लीच्या एका व्यक्तीला अॅमेझॉन सेलमध्ये नवा फोन खरेदी करणे महागात पडले आहे.
दिल्लीच्या नमन वैशने अॅमेझॉन फेस्टिवल सेलमध्ये शाओमीचा प्रसिद्ध स्मार्टफोन रेडमी 8A Dual खरेदी केला होता. परंतु, फोनच्या बदल्यात मोबाइलच्या डब्यात कपडे धोन्याचा रिन साबण मिळाला आहे.
दिल्लीच्या नमन वैशने १७ ऑक्टोबर रोजी अॅमेझॉन सेलमध्ये आपला मनपसंत फोन रेडमी८ए ऑर्डर केला होता. गेल्या रविवारी सामान घरी पोहोचले. परंतू, डब्बा उघडला तर त्यांना धक्काच बसला.
७ हजार रुपयांचा फोन ऐवजी बॉक्समध्ये १४ रुपयांचा साबण होता. नमनने याचा फोटो ट्विट करीत सोशल मीडियावर अॅमेझॉनला टॅग केले आहे. तसेच म्हटले की, ग्राहकांचा असा विश्वास तोडू नका.
अॅमेझॉनने तात्काळ याला रिप्लाय देत म्हटले की या प्रकरणाचा तपास करून नमनला ४ ते ५ दिवसात फोन दिला जाईल. या घटनेला सेलर जबाबदार आहे. तसेच या घटनेबद्दल आपल्या दुःख झाल्याचे अॅमेझॉनने म्हटले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज