टीम मंगळवेढा टाईम्स।
पुण्यामधील कॉलेजमध्ये बस लावून महिन्याला ७० ते ८० हजार रुपये मिळवून देतो असे आमिष दाखवून एका पोलिसाची ४ लाख ५५ हजार रुपयांची व
एका तरुणाची देखील कमी किमतीत इनोव्हा गाडी देतो म्हणून ४ लाख ४६ हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार पंढरपुरात समोर आला आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सागर बाळासाहेब कारंडे (वय ३२, रा. आनंदनगर टाकळी रोड, पंढरपूर) हे शासकीय कामकाजासाठी खाजगी कारने हायकोर्ट मुंबई येथे गेले होते.
त्यावेळेस त्यांच्यासोबत कार चालक म्हणून रणजित तुकाराम कुंभार (वय ३०, रा. भोसे करकंब, ता. पंढरपूर) हा गेला होता. रणजित कुंभार याने आपण पुण्यामधील जेएसपीएम कॉलेजमध्ये बस लावून महिन्याला ७० ते ८० हजार रुपये मिळवून देतो असे आमिष दाखवले.
यामुळे कारंडे स्कूल बस घेण्यास तयार झाले. त्यानंतर मेढा (सातारा) येथील शिंदे नामक व्यक्तीची १७ सीटर ट्रॅव्हल्स टेम्पो विकायचा आहे, आपण घ्यायचा का, असे कुंभार याने कारंडे यांना विचारले.
नंतर लोन मंजूर झाले नाही असे सांगून बोलणे टाळत होता. त्याचबरोबर फोन बंद ठेवला. यानंतर सागर करंडे यांनी गाडी मालकांना फोन केला असता,
कुंभार याने गाडीचा व्यवहार रद्द झाल्याचे सांगून पैसे माघारी नेल्याचे उत्तर कारंडे यांना गाडी मालकाने दिले. यानंतर कारंडे यांच्या लक्षात आले की आपली फसवणूक झाली.
८ लाखांचा अपहार..
रणजित कुंभार याने अक्षय अरुण नेहतराव (वय २६ रा. गोविंदपुरा अरुण टॉकीजजवळ, पंढरपूर) यांना इनोवा क्रिस्टा गाडी कमी किमतीत घेऊन देतो असे म्हणून त्यांच्याकडून ४ लाख ४६ हजार रुपये घेतले आहे.
कारंडे व नेहतराव यांनी असे एकूण ८ लाख १ हजार रुपये विश्वासाने कुंभारकडे सोपवलेल्या रकमेचा मध्येच अपहार केला.
गाडी मालकांशी संवाद करुन दिल्याने ठेवला विश्वास
गाडी मालक शिंदे यांच्याशी फोनवर संवाद साधून दिला. गाडी ७ लाख रुपयांना घ्यायचे ठरले. गाडी घेण्यासाठी टोकन म्हणून पोलिस कर्मचारी कारंडे यांच्याकडून २ लाख २५ हजार रुपये घेतले.
त्याचबरोबर ठाणे येथील संजय अशोक बागल यांची २७ सीटर ट्रॅव्हल्स गाडी क्रमांक एम एच ०४ जी. पी. ७००९ घेण्यासाठी मालकाशी बोलणे करून दिले.
गाडी ७ लाख २५ हजार रुपयांना घ्यायचे ठरले. याची टोकन म्हणून एनएफटीद्वारे २ लाख ५० हजार रुपये घेतले. यानंतर दोन्ही गाडी मालकांना व तुम्हाला बोलवून एकदमच सह्या घेऊन गाडीचे लोन पास करून घ्यायचे असे सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज