टीम मंगळवेढा टाईम्स ।
कांदा उत्पादक शेतकरी यांच्या सोयीसाठी प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर आज शुक्रवार दि.२६ जानेवारी पासुन मंगळवेढा कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये कांदा सौदे लिलाव दररोज सुरु होणार असल्याची माहिती सभापती सुशील आवताडे यांनी दिली.
कृषि उत्पन्न बाजार समिती सभागृहात सर्व कांदा आडत व्यापारी व शेतकरी यांची बैठक घेण्यात आली. सदरच्या बैठकीमध्ये कांदा सौदे लिलावबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
बाजार समिती संचालक मंडळाने शेतक-यांचा हितासाठी अनेक विधायक उपक्रम राबविले आहेत. बाजार समितीने कांदा सौदे लिलाव सुरु केल्यापासुन २० कोटींची उलाढाल झाली आहे.
बाजार समिती आपला शेतीमाल विक्रीसाठी घेऊन येणा-या शेतकऱ्यांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेअंतर्गत सुसज्ज असे शेतकरी भवन, कांदा सौदे लिलावासाठी नवीन सेलहाॅल बांधकाम करणेचा मानस आहे.
कांदा सौदे लिलाव हे दररोज सकाळी ९ वाजता सुरू होतील तसेच प्रत्येक आठवड्यातील दर मंगळवार सौदे लिलावासस साप्ताहिक सुट्टी राहील अशी माहिती सभापती सुशील आवताडे यांनी दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज