टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथे मोबाईल चोरल्याच्या संशयावरून संजय जगन्नाथ नकाते (वय 33) या युवकास मारहाण करीत डोकीत दगड मारून गंभीर जखमी केल्याप्रकरणी माऊली जाधव व बबन जाधव या दोघा भावांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी संजय नकाते हे दि. 12 रोजी रात्री 9.00 वा. गावातील पाण्याच्या टाकीजवळ थांबले असता वरील दोघा आरोपीनी तु माझा मोबाईल चोरला आहे असे म्हणून दोघांनी शिवीगाळ केली.
यावेळी फिर्यादी मला शिवीगाळ का करताय मी मोबाईल चोरला नाही असे म्हणत असताना आरोपीने फिर्यादीच्या गच्चीला पकडून पडलेला दगड घेवून डोकीत पाठीमागील बाजूस मारून गंभीर जखमी केले.
यावेळी गावातील इमाम मुलाणी व प्रशांत गुळमिरे या दोघांनी भांडणे सोडवा सोडवी केली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.याचा अधिक तपास पोलिस नाईक दयानंद हेंबाडे हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज