मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मुंगी पावडर असलेल्या ग्लासमधून एकाने दारू ढोसली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे.
दारू पिण्याच्या गडबडीमध्ये एका तरुणाने मुंग्याची पावडर असलेल्या ग्लासमध्ये दारू घालून पिल्याची घटना मोहोळ तालुक्यातील कोरवली गावात मंगळवारी रात्री घडली.
यामुळे त्याला त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
श्रीकांत तानाजी भोपळे (वय २७, रा. कोरवली) असे त्या तरुणाचे नाव आहे. त्याने मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास राहत्या घरात दारू पिण्यासाठी ग्लास घेतला असता त्यामध्ये अगोदरपासूनच मुंग्यांची पावडर होते.
त्यातच त्याने दारू टाकून पिल्याने त्याला उपचाराकरिता छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.
विकास प्राधिकरणात व्यवस्थापकाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून साडेचार लाखाची फसवणूक
मुंबईतील विकास प्राधिकरणात व्यवस्थापकाची नोकरी देण्याचे अमिष दाखवून दोघा भामटयाने सोलापुरातील एका तरुणाला साडेचार लाख रुपयांना फसविल्याची घटना शहरातील जुना पुना नाका परिसरातील अवंती नगर भाग- २ येथे घडली.
अमित भारत मस्के (वय २९, रा. प्लॉट नंबर ११ बी, अवंती नगर सोलापूर) असे फसविलेल्या तरुणाचे नाव असून याप्रकरणी त्याने फौजदार चवळी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी सुनीत प्रीतम आठवले (रा. गुरुनानक हॉस्पिटललगत,
बांद्रा ईस्ट, मुंबई) आणि संजय रामचंद्र वाधवा (रा. जोशी चाळ, जुना एसटी रोड शहर पी अँड टी कॉलनी, सांताक्रुज पूर्व, मुंबई) अशा दोघांविरुध्द भादवि कलम ४२० सह ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांचे विशेष पथक मुंबईकडे रवाना झाले आहेत. नोकरीच्या शोधात असलेला तरुण अमित मस्के याचे नातेवाईक वंदना चंदनशिवे यांनी आरोपी सुनीत आठवले याच्याशी नोकरीसाठी ओळख करून दिली होती.
या ओळखीत आरोपीने त्यास मेकॅनिकल डिझाईनिंग इंजीनियरिंग झाल्याची कागदपत्रे घेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरीस लावण्याची बतावणी केली होती. यासाठी साडेचार लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले होते. त्याच्या आमिषाला बळी पडले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज