टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी ते शेटफळ रोडवर एका मोटर सायकलस्वाराने राँग साईडने येवून दुसऱ्या मोटर सायकलस्वारास जोराची धडक दिल्याने
त्यामध्ये शंकर दुर्यो पळसे हे गंभीर जखमी होवून उपचारादरम्यान मयत झाले.
त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी नामदेव दादा कचरे (रा.मरवडे) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील मयत तथा मोटर सायकलस्वार शंकर पळसे हे दुपारी ३.३० वा. शेटफळ ते लक्ष्मी दहिवडी रोडवरून
एम.एच १३ बी.झेड ४४५२ वरून जात असताना समोरून राँग साईडने एम.एच १३ सी.झेड ६२४८ या मोटर सायकलवरून
येणारे नामदेव कचरे यांनी वेगात मोटर सायकल चालवून जोराची धडक देवून मयत शंकर पळसे याच्या मृत्यूस कारणीभूत झाला असल्याची फिर्याद दुर्योधन पळसे रा.शेटफळ यांनी दिल्यावर आरोपीविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज