मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
सोलापूर जिल्हयात नुकतेच आलेल्या महापुराने अनेक गावे पाण्याने वेढली होती. दरम्यान हे पाणी घरात शिरल्यामुळे अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले. नागरिकांना शाळा, ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी आश्रय घेण्याची वेळ आली होती.
या पूरग्रस्त लोकांना मंगळवेढा महसूल विभागाच्या कर्मचार्यांकडून एक दिवसाचा पगार देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.
शिरसी येथील हटसन अॅग्रो प्रोडक्टस यांनी पूरग्रस्तांना 4000 विविध साहित्याचे किट अप्पर जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केली.
दरम्यान महसूल विभागाकडून प्रांताधिकारी बी.आर.माळी,तहसीलदार मदन जाधव,नायब तहसीलदार शुभांगी जाधव,महसूल नायब तहसीलदार शितल कन्हेरे आदींनी परिश्रम घेतले.
सोलापूर जिल्हयात तिर्हे येथील सीना नदीला महापूर आल्यामुळे अनेक गावात पाणी शिरल्यामुळे मोठया प्रमाणात कुटुंबांना स्थलांतरीत होण्याची वेळ आली.
या कुटुंबाना दिलासा म्हणून मंगळवेढा तालुक्यातून शिरशी येथील हटसन अॅग्रो प्रोडक्टस यांनी ब्रेड पाकिट 500 ,बिस्कीट-500 पाकिट,मसूर दाळ -500 पाकिट,तेल पाकिट-500, मीठ -500 पाकिट, आटा – 500 पाकिट,लाल तिखट- 500 पाकिट असे एकूण 4000 पाकिटे जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आली.
यावेळी महसूल विभागातील शिवाजी भोसले, अविनाश शिंदे, ज्ञानेश्वर गायकवाड, राजशेखर जमादार आदी उपस्थित होते.
मंगळवेढा महसूल विभागाकडून प्रांताधिकारी -10,000 रू, तहसीलदार – 7,000 रू, नायब तहसीलदार -5000 रू तसेच महसूल विभागातील सर्व कर्मचारी एक दिवसाचा पगार, प्रांत कार्यालय येथे एकूण 7 कर्मचारी असून हे कर्मचारीही आपला एक दिवसाचा पगार पूरग्रस्तांना देणार असल्याचे सांगण्यात आले.
सोलापूर जिल्हयातील सर्व शिक्षण विभागाकडून 71 लाख,74 हजार 772 रूपये पूरग्रस्तांना देण्यात आले आहेत.यामध्ये तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे -मंगळवेढा – 4,80,300 रू,अक्कलकोट – 6,55,656 रू,बार्शी – 5,1122 रू.करमाळा – 6,59,101 रू,माढा – 7,22,011 रू,मोहोळ – 8,46,301 रू,सांगोला – 6,23,000,
सोलापूर नॉर्थ- 2,82,753 रू,सोलापूर साऊथ -6,66,017,पंढरपूर – 9,14,200 रू.माळशिरस – 8,24,311 रू असे एकूण 71 लाख 74 हजार 772 रूपयांचा निधी जिल्हयातील शिक्षण विभागाकडून पुरग्रस्तांसाठी देण्यात आला आहे.
मंगळवेढयात गटशिक्षणाधिकारी दर्शन मेहता, विस्ताधिकारी डॉ.बिभीषण रणदिवे, पुरुषोत्तम राठोड, संतोष मोरे आदींनी यासाठी परिश्रम घेतले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज