टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील प्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालयामध्ये ज्ञानज्योती क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिनाचे औचित्य साधून माता पालकांचीच भरविली एक दिवसाची शाळा.
प्रायमामधील मुलां-मुलींना एक दिवसाची सुट्टी देण्यात आली. मुलां-मुलींच्या ऐवजी माता पालकांना शाळा भरविण्यात आली. आजच्या माता पालकांचे प्रवेशव्दारात रांगोळी काढून स्वागत करण्यात आले.
मुलां-मुलींना दररोज ज्या पध्दतीने राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, परिपाठ, वाराप्रमाणे भजन घेतले जाते अगदी त्याच पध्दतीने सावित्रीच्या लेकी बनून आलेल्या माता पालकांचे देखील घेण्यात आले.
शाळेचा जसा गणवेश असतो तसाच गणवेश प्रत्येक माता पालकांना पिवळ्या रंगाची साडी हा ड्रेसकोड करण्यात आला होता. राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, परिपाठ, वाराप्रमाणे भजन घेतल्यानंतर
पालक समितीच्या सदस्या रेश्मा भगरे, पल्लवी मुढे, संजना जावळे, माधुरी गवळी, तेजस्विनी इंगळे यांच्या हस्ते श्री सरस्वती मूर्ती आणि भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका,
थोर समाज सुधारक आणि कवियत्री सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर माता पालक अर्चना बुरुंगले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती सांगितली.
त्यानंतर माता पालक वंदना गुप्ता यांचे औक्षण करुन वाढदिवस साजरा करण्यात आला.
माता पालक सरोज क्षिरसागर म्हणाल्या, बालवाडीपासून सुरु झालेले शिक्षण शिशु वर्ग, लहान वर्ग, मोठा वर्गात बसण्याचा योग आज प्रायमामुळे आला. खूपच छान उपक्रम वाटला.
आपली मुले तीन तास शाळेत काय करतात याचा प्रत्यक्षात अनुभव मिळाला. विशेष कौतुक करावे ते शिक्षकवृंदाचे सलग तीन तास आर्तता, उत्सफुर्तता, प्रामाणिकपणा दाखविणे सोपे नसते. पण ज्या शाळेचा प्रमुख प्रत्येकवेळी सर्वाबरोबर असतो ती शाळा नक्कीच आदर्श आहे.
माता पालक शायरदेवी राजपुरोहित म्हणाल्या, आज स्कूल में आकर बहुत अच्छा लगा, मुझे मेरे बचपन की याद आयी, यहाँ आकर मुझे गर्व है की मेरे बच्चे इस स्कूल में पढने को आते है, सब टीचर बहुत अच्छेसे शिखाते है, इतना सारा शिखाते है की आज पता चला.
माता पालक योगिता वाघमारे म्हणाल्या, आज मला समजले माझे बालपणाचे शिक्षण आणि माझ्या मुलाचे बालपणीचे शिक्षण यामध्ये किती बदल झाला आहे. जे मला पहिलीत येत नव्हते तो अभ्यास माझ्या मुलाला पहिलीत जाण्याच्या आधीच येतोय. खरंच मी प्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालयाचे खूप आभार मानते.
माता पालक मयुरी राजमाने म्हणाल्या, आज शाळेत माता पालकांची शाळा हा उपक्रम झाला. तो खूप उत्कृष्ट होता. नवीन अनुभव व बालपण अनुभवयाला मिळाले त्याबद्दल खूप धन्यवाद. कृतियुक्त शिकविण्याची पध्दत खूप उत्तम आहे. या शाळेत मुलीचा प्रवेश घेतला आम्ही खूप समाधानी आहोत. सर्व शिक्षिकां खूप मेहनत घेतात त्यांचे पण खूप धन्यवाद. असेच उपक्रम घ्यावेत.
सर्व माता पालक आपापल्या मुलां-मुलींच्या वर्गात गेल्या. त्या वर्गातील शिक्षिकांनी त्यांचा कृतियुक्त अभ्यास व खेळ, गप्पा गोष्टी, गाणी, घेतला. मुलां-मुलींच्या प्रमाणेच जेवणाची सुट्टी करण्यात आली. या आगळ्या उपक्रमांचे सर्व पालकांनी कौतुक केले.
एक दिवसाची माता पालकांची शाळा यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सचिवा वैशाली कुंभार व अध्यक्ष नीलकंठ कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षिका सविता रत्नपारखी, लता कुलकर्णी, पूजा ढोणे, अश्विनी टाकणे, सुनिता कुंभार, निता डोके, स्वाती माळी, गीता गुंगे, सीमा सुर्यवंशी, संध्या कसबे तर मदतनीस सुजाता मुदगूल, शिला पलंगे, सुजाता चिंचकर यांनी परिश्रम घेतले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज