टीम मंगळवेढा टाईम्स।
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये वारे फिरताना दिसले. मोदी लाट ओसरत असताना दिसते आहे तर काँग्रेस पुन्हा उदयास येताना. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दोन मतदारसंघात निवडणूक लढवली आणि दोन्ही ठिकाणी ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.
उत्तर प्रदेशच्या रायबरेलीत आणि केरळच्या वायनाडमध्ये राहुल गांधींचा विजयी झाले आहे. पण राहुल गांधी धर्मसंकटात अडणार आहेत.
राहुल गांधी गेल्या वेळी रायबरेलीला लागून असलेल्या अमेठी मतदारसंघातून पराभूत झाले होते. त्यांनी अमेठीतून तीन वेळा निवडणूकही जिंकली आहे. 2004 मध्ये पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर ते 2019 मध्ये भाजपच्या स्मृती इराणी यांच्याकडून पराभूत झाले. पण त्याचवेळी 2019 साली राहुल गांधींनी वायनाडमध्येथं रेकॉर्डब्रेक मतांनी विजय मिळवला होता. त्यांना 706367 मतं मिळाली होती.
रायबरेली आणि वायनाड अशा दोन जागा लढवणारे राहुल गांधी विजयी झाले आहेत पण आता कोणता मतदारसंघ निवडायचा आणि कोणता सोडायचा हे मोठं धर्मसंकट त्यांच्यासमोर असणार आहे.
वायनाडच्या माध्यमातून दक्षिण भारताशी जोडण्याची संधी
राहुल गांधींना वायनाडच्या माध्यमातून दक्षिण भारताशी जोडण्याची चांगली संधी मिळाली आहे. तिथं त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली.
या कनेक्टिव्हिटीमुळे ते दक्षिणेकडील राज्यांमध्ये जाहीर सभा चांगल्या प्रकारे हाताळत आहेत. दक्षिणेकडील राज्यांमध्ये काँग्रेसचा पाठिंबा वाढणं हेही महत्त्वाचं आहे.
रायबरेलीत वारसा जपण्याची जबाबदारी
काँग्रेस नेते राहुल गांधी पहिल्यांदाचा रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले. सोनिया गांधी यांचा हा मतदारसंघ. या निवडणुकीत प्रकृतीच्या कारणास्तव सोनिया गांधी यांनी निवडणुकीतून माघार घेतली त्यामुळे राहुल गांधींनी ही सीट लढवली.
देशाच्या स्वातंत्र्यापासून हा मतदारसंघ गांधी घराण्याशी संबंधित. मोदी लाटेतही काँग्रेस इथं हरली नाही. काँग्रेसचा गड मानला जाणाऱ्या या मतदारसंघाचं सोनिया गांधी 2004 पासून प्रतिनिधीत्व करत होत्या. आता राहुल गांधी वारसा जपण्याच्या नावाखाली रायबरेलीत उतरले होते. राहुल गांधींनी आपली जागा अमेठीहून रायबरेलीला बदलली.
राहुल यांच्या नामांकनात त्यांची आई आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही सहभाग घेतला होता. रायबरेलीच्या लोकांनाही रायबरेली आपण आपल्या मुलाकडे सोपवत असल्याचं सांगितलं होतं. प्रियांका गाधी यांनीही रायबरेलीला राहुल गांधींच्या कुटुंबाची जागा म्हटलं होतं. अशा परिस्थितीत त्यांनी रायबरेलीची जागा सोडण्याचा निर्णय घेतल्यास रायबरेली आणि अमेठी या दोन्ही भागातील जनता त्यांच्यावर नाराज होऊ शकते.
वायनाडमध्ये विक्रमी विजयानंतर पुन्हा निवडणूक लढले
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये केरळचा वायनाड मतदारसंघ हाय प्रोफाईल बनला आहे. या सीटवर काँग्रेस नेता राहुल गांधींनी पुन्हा निवडणूक लढवली. गेल्या वेळी रेकॉर्ड मार्जिननं त्यांनी इथं विज मिळवला होता.
2014 आणि 2019 सालातील वायनाडमधील निकाल
2019 साली राहुल गांधींनी इथं रेकॉर्डब्रेक मतांनी विजय मिळवला होता. त्यांना 706367 मतं मिळाली होती. जी 64.7% आहेत. तर दुसरीकडे लेफ्ट उमेदवार पीपी सुनीर यांना फक्त 274597 मतं मिळाली होती. ऐतिहासिक मतांनी राहुल गांधींनी ही सीट आपल्या नावावर केली.
तर 2014 साली काँग्रेसच्याच एमआय शनावास यांनी विजय मिळाला होता. त्यांना 377035 वोट मिळाले होते. तर त्यांच्या विरुद्ध असलेले लेफ्टचे सथ्यन मोकरी यांना 356165 वोट मिळाले होते.
अमेठीचं मैदान सोडून गेल्याची टीका
राहुल गांधी रायबरेलीची निवड केल्यानंतर त्यांच्यावर अमेठीचं मैदान सोडून पळून गेलं अशी टीका स्मृती इराणी यांनी केली होती. तसंच दिनेश प्रताप सिंग यांनी राहुल गांधींना सहज हरवण्याचा दावा केला होता.(स्रोत:News 18 लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज