टीम मंगळवेढा टाईम्स।
पुणे महामार्गावर टेंभुर्णी नजीक काल रात्री शिराळपाटी जवळ सोलापूर शहर पोलीसांच्या बॉम्बशोधक पथकाच्या वाहनाला अपघात झालायं.
आयशर टेम्पोनं पोलीस गाडीला पाठीमागून धडक दिली आणि त्यानंतर पोलीस गाडी पालथी होवून सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना कमी-अधिक प्रमाणात मुकामार लागला आहे.
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीत शुक्रवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास शिराळा पाटीजवळ पोलिसांची व्हॅन व टेम्पोचा अपघात झाला.
यात सहा पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती टेंभुर्णी पोलिसांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज शुक्रवार पहाटे एकच्या सुमारास सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णीजवळील शिराळा पाटीजवळ
सोलापूर शहर पोलिसांची बीडीडीएस गाडी नंबर एमएच १३ सीयू ०७३३ ही पुण्याहून सोलापूरकडे येत असताना पाठीमागून सोलापूरकडे येत असलेला टेम्पो एमएच ४३ बीपी ९५५१ या गाडीने पोलिसांच्या व्हॅनला जोराची धडक दिली.
या धडकेत सहा पोलिस कर्मचारी व एक श्वान जखमी झाला आहे. या अपघातात जखमी झालेल्या पेालिसांवर टेंभुर्णी येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलीस नाईक चुंगे, पोलीस कॉन्स्टेबल रोकडे, शिंदे, सावंत, पोलीस नाईक गवळी, बंडदाळ असे जखमी झालेल्या पोलिसांची नावे आहेत.
पोलीस नाईक प्रविण चंद्रकांत घुगे, मंगेश राघोबा रोकडे, रोहित प्रकाश शिंदे, अंकुश विनायक सावंत, सुदर्शन सुभाष गवळी, अमोल महादेव बांदल असे जखमी झालेल्या पोलिसांची नावे आहेत.
या अपघातानंतर टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या अधिकारी, अंमलदार यांनी तात्काळ अपघातस्थळावर पोहोचून जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.
त्यानंतर विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज