mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आण्णांचे विचार! पुढील हंगामामध्ये गळीतास निडव्या ऊसास १००रुपये जादा दर देणार; चेअरमन अभिजीत पाटील यांची मोठी घोषणा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 24, 2023
in सोलापूर
आण्णांचे विचार! पुढील हंगामामध्ये गळीतास निडव्या ऊसास १००रुपये जादा दर देणार; चेअरमन अभिजीत पाटील यांची मोठी घोषणा

टीम मंगळवेढा टाईम्स।  राजेंद्र फुगारे

पंढरपूर तालुक्यातील वेणुनगर-गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे संस्थापक चेअरमन व माजी आमदार कर्मवीर कै. औदुंबररावजी (आण्णा) पाटील यांची १०० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या प्रसंगी कारखाना कार्यस्थळावरील कर्मवीर कै. औदुंबररावजी (आण्णा) पाटील यांचे पुर्णाकृती पुतळ्याची विधीपूर्वक पुजा कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज पंढरपूरचे माजी प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव डॉ.जे.जी. जाधवसर, कारखान्याचे जेष्ठ सभासद श्री मधुकर नाईकनवरे, पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री बाळासाहेब पाटील,

श्री विठ्ठल हॉस्पीटलचे सचिव श्री अभिजीत राजाराम पाटील यांचे शुभहस्ते व कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत आबा पाटील, श्री रणजित राजाराम पाटील, अमरजित राजाराम पाटील व सर्व संचालक मंडळ यांचे प्रमुख उपस्थितीत सपन्न झाला.

याप्रसंगी आमदार रोहितदादा पवार यांचे वडील श्री राजेंद्र पवार यांनीही आवर्जून उपस्थित राहून कै. औदुंबर (आण्णा) पाटील यांना आदरांजली वाहिली.

कर्मवीर यावेळी कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीतआबा पाटील म्हणाले की, कै. औदुंबरआण्णा पाटील व्यापारी दृष्टीकोण घेवून पंढरपूर तालुक्यात आले व त्यांना सर्वांच्या सहकाऱ्यांनीच विधानसभेत जाणेची संधी मिळाली व कै. यशवंतरावजी चव्हाण व श्री शरदचंद्रजी पवारसाहेब यांचे विचारातून कमी खर्चात

श्री विठ्ठल कारखान्याची निर्मिती करुन पंढरपूर तालुक्यात कृषी व औद्योगिक क्रांती करुन दाखविली. कै. औदुंबर आण्णांनी अतिशय काटकसर करुन स्वभांडवलातून कारखान्याचे विस्तारीकरण करुन सातत्याने सोलापूर जिल्ह्यात एक नंबरचा व महाराष्ट्रात सहा नंबरचा दर देवून कारखान्यास वैभव प्राप्त करुन दिले.

त्यांनी कै. आण्णांच्या जुन्या आठवणींना उजाळा देवून म्हणाले की, आम्हीही कै. औदुंबरआण्णांच्या पावलावर पाऊल ठेवून कारखान्याचा कारभार करुन यापुढे सर्वात जास्त दर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चालू हंगामामध्ये श्री विठ्ठल कारखान्याचे २२ दिवसात १,७५,६१५ मे.टन गाळप झाले असून या गळीत हंगामामध्ये १० लाख मे.टनाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट ठेवले असून सर्व सभासद शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण पिकविलेला ऊस श्री विठ्ठल कारखान्यास देवून सहकार्य करणेचे आवाहन केले,

आपले कारखान्याकडे नोंदलेल्या सर्व ऊसाचे आम्ही गाळप करणार आहे, तसेच सभासद शेतकऱ्यांनी यावर्षी तुटलेला खोडवा ऊस ठेवून त्याची निडवा ऊस म्हणून कारखान्याकडे नोंद करुन पुढील २०२४-२५ गळीत हंगामामध्ये गळीतास दिल्यास या निडव्या ऊसास रुपये १००/- प्र.मे.टन जादा दर देणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

कर्मवीर कै. औदुंबररावजी (आण्णा) पाटील यांचे १०० व्या जयंतीनिमित्त कारखान्यामध्ये उत्पादानाशी निगडीत अखंड प्रामाणिकपणे उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या सेवकांचा प्रातिनिधीक स्वरुपात गुणगौरव सन्मान चिन्ह व मानधन देवून उपस्थितांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला

व यापुढेही कै.आण्णांच्या जयंतीच्या वेळी सर्व विभागातील कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार म्हणून गौरव करणेत येईल, असे श्री विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत आबा पाटील यांनी सांगीतले.

या प्रसंगी कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज पंढरपूरचे माजी प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव डॉ.जे.जी. जाधवसर म्हणाले की, कर्मवीर कै. भाऊरावआण्णा पाटील यांचे विचारातून रयत शिक्षण संस्था महाराष्ट्रात नावा रुपाला आली व

कर्मवीर कै. औदुंबरआण्णा पाटील यांच्या विचाराने श्री विठ्ठल कारखान्यास महाराष्ट्रात वैभव प्राप्त झाले आणि श्री अभिजीत पाटील या तरुण नेतृत्वाने कै.औदुंबरआण्णाच्या कारभाराचा आदर्श घेवून दोन वर्ष बंद पडलेला कारखाना चालू करुन श्री विठ्ठल कारखान्यास ते गतवैभव प्राप्त करुन देतील.

कै.औदुंबर आण्णांच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा देल म्हणाले की, संचालक, शेतकरी सभासद, कामगार हे संपूर्ण संस्थेचे विश्वस्त आहेत, आपण सर्वांनी कारखान्यावर प्रेम व निष्ठा ठेवून कामकाज करावे, चेअरमन श्री अभिजीतआबा पाटील यांना सहकार्य करावे, असे त्यांनी सर्वांना आवाहन केले.

सदर कार्यक्रमामध्ये शेतकरी संघटनेचे नेते व श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक श्री सचिन शिंदे-पाटील, कारखान्याचे माजी संचालक श्री प्रकाशआप्पा पाटील तिसंगी, माजी नगराध्यक्ष श्री सुभाष भोसले, कारखान्याचे जेष्ठ सभासद श्री मधुकर नाईकनवरे, श्री रणजित राजाराम पाटील, श्री शशिकांत पाटील, प्रा. आप्पासाहेब पाटीलसर, श्री प्रविण भोसले, श्री औदुंबर शिंदे, श्री कातीलाल गलांडे यांनी कै. औदुंबर आण्णा पाटील यांचे जुन्या आठवणींना उजाळा देवून आपली मनोगते व्यक्त केली व कारखान्याचे पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

स्वागत व प्रस्ताविक कारखान्याचे संचालक प्रा. तुकाराम मस्केसर यांनी केले तर कारखान्याचे संचालक श्री दिनकरदाजी चव्हाण यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व सुत्रसंचलन श्री चव्हाणसर यांनी केले.

सदर कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता रोंगे, संचालक सर्वश्री संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, सचिन वाघाटे, जनक भोसले, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, दत्तात्रय नरसाळे, सिताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, श्रीमती कलावती महादेव खटके, सौ सविता विठ्ठल रणदिवे,

तज्ज्ञ संचालक सर्वश्री दशरथ जाधव, अशोक तोंडले, तुकाराम मस्के, धनाजी खरात, सचिन शिंदे-पाटील, तानाजी बागल, उमेश मोरे, अंगद चिखलकर, अशोक घाडगे, गणेश ननवरे, समाधान गाजरे, प्र. कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड, एम.एस.सी. बँक प्रतिनिधी सी. एस. पाटील,

श्री विठ्ठल प्रशालेचे प्राचार्य व त्यांचा स्टाफ तसेच कारखान्याचे सभासद, कार्यकर्ते, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार, सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व संचालक व मान्यवरांनी याप्रसंगी कर्मवीर औदुंबररावजी (आण्णा) पाटील यांना आदरांजली वाहिली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अभिजित पाटील

संबंधित बातम्या

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

नदी वाचवा, निधी द्या! भीमेच्या शुद्धीकरणासाठी १०० कोटी द्या; आमदार आवताडेंची सरकारकडे आग्रही मागणी; विधानसभेत घुमवला आवाज

March 17, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! ​गरीबांच्या हक्काच्या पैशावर डल्ला; लाचखोर ग्रामपंचायत कर्मचारी अटकेत

March 17, 2026
कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबीर: मोफत तपासणी आणि उपचारांची सुवर्णसंधी

March 17, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! सोलापूर जिल्ह्यातील शाळांचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून सुरू होणार सुट्ट्या

March 17, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

ब्रेकिंग! सोलापूर झेडपी अध्यक्षपदाचा पेच सुटणार? पालकमंत्र्यांकडे सर्वांच्या नजरा; ‘ही’ नावे आहेत सर्वात पुढे

March 16, 2026
Next Post
मंगळवेढ्यातील ‘या’ ग्रामपंचायतीवर महिलाराज! सरपंच, उपसरपंचपदी महिला विराजमान; सोनवणे यांची बिनविरोध निवड

मंगळवेढ्यातील 'या' ग्रामपंचायतीवर महिलाराज! सरपंच, उपसरपंचपदी महिला विराजमान; सोनवणे यांची बिनविरोध निवड

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

March 19, 2026
नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..