mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सुभाष शहा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज डॉ.अमर अडके यांचे शिवचरित्र व्याख्यान

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 18, 2024
in मंगळवेढा, मनोरंजन, शैक्षणिक
मंगळवेढ्याच्या विकासाचा महामेरू; स्व.सुभाषराव शहा यांची आज पुण्यतिथी; रतनचंद शहा बँकेत कार्यक्रमाचे आयोजन

टीम मंगळवेढा टाईम्स ।

रतनचंद शहा सहकारी बँकेचे माजी चेअरमन स्व.सुभाष शहा यांच्या १२ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आज दि.१८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता प्रतिमेचे पूजन व व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

कोल्हापूर येथील वक्ते डॉ.अमर अकडे यांचे शिवचरित्र पर व्याख्यान रतनचंद शहा बॅंके समोरील पटांगणात संपन्न होणार आहे.

आज होणाऱ्या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा यांनी केले आहे.

आठ लाखांपर्यंत उत्पन्न; मुलींना उच्च शिक्षण मोफत; डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर | अभ्यासक्रमांचा समावेश; खासगी कॉलेज, अभिमत विद्यापीठांतही योजना लागू; राज्य सरकार देणार १०० टक्के परतावा

पालकांचे आठ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या आणि राज्यातील कला- विज्ञान- वाणिज्यबरोबरच वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींच्या १०० टक्के शुल्काचा परतावा राज्य सरकार करणार आहे.

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून ही योजना लागू केली जाईल. राज्यातील लाखो विद्यार्थिनींना याचा फायदा होणार आहे. लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत या संबंधात निर्णय अपेक्षित आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागातील उच्च पदस्थ सूत्रांनी  दिली.

उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मात्र आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागणाऱ्या विद्यार्थिनींना याचा मोठा फायदा होणार आहे. गेल्या वर्षी अभिमत विद्यापीठांमधील राखीव जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्क परताव्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता पालकांचे उत्पन्न ८ लाखांच्या आत असलेल्या मुलींचे १०० टक्के शुल्क सरकार भरणार आहे.

नव्या-जुन्या ८४२ अभ्यासक्रमांचा समावेश

सध्या शुल्क परताव्यापोटी राज्य सरकारच्या तिजोरीवर ३०० कोटीचा भार येतो आहे. मुलीच्या १०० टक्के शुल्क परताव्याचा निर्णय झाल्यास राज्याच्या तिजोरीवर एक हजार कोटीचा भार येईल. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच प्रस्ताव आणला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागातील सूत्रांनी दिली.

राज्यात असलेल्या ? आणि नव्याने मान्यता मिळालेल्या साधारण २०० अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना याचा लाभ होणार आहे. जळगावमध्ये एका कार्यक्रमात बोलताना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची घोषणा केली होती, हे येथे उल्लेखनीय.

या अभ्यासक्रमांत आणि संस्थांमध्ये योजना लागू

■ सर्व प्रकारचे डिप्लोमा, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम.

■ खासगी महाविद्यालये आणि अभिमत विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना या निर्णयाचा फायदा.

■ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांच्या आत असल्याचे प्रमाणपत्र विद्यार्थिनींना सादर करावे लागेल.

■ प्रमाणपत्र सादर केल्यानंतर विद्यार्थिनींना फीचा १०० टक्के परतावा.

सध्या ही व्यवस्था

खासगी संस्थांमध्ये अनुसूचित जाती- जमातींकरिता आरक्षित जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे १०० टक्के शुल्क सरकारतर्फे भरले जाते. ओबीसी, ईबीएस, ईडब्ल्यूएससाठी आरक्षित (याकरिता पालकांच्या वार्षिक आठ लाख उत्पन्नाची अट आहे.) जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ५० टक्के शुल्काचा परतावा सरकार करते.

काय होणार नेमका फायदा?

■ महाराष्टातील उच्च शिक्षणात विद्यार्थिनींचे घटते प्रमाण रोखण्यास या निर्णयामुळे मदत होणार आहे.

■ महाराष्ट्रात २०२०-२१ मध्ये २०,५४,२५२ इतक्या मुलींनी विविध पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला होता.

■ २०२१-२२ मध्ये ही संख्या १९,२४० ने कमी होऊन २०,३५,०१२ इतकी नोंदली गेली आहे.

■ या तुलनेत उच्च शिक्षण घेणाऱ्या राज्यातील मुलांची संख्या वाढल्याचे दिसून येते.

ग्रामीण भागातील मुलीचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढेल. शहरातही मुलीच्या शिक्षणावर खर्च करताना काही पालक हात आखडता घेतात. – सुनील कर्वे, शिक्षणतज्ज्ञा आणि एमईटीचे आजीवन विश्वस्त

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: स्व.सुभाष शहा

संबंधित बातम्या

सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

भयानक! ऑनलाइन रम्मीचा डाव संपूर्ण कुटुंबाच्या जीवावर बेतला; कर्जबाजारीपणातून तरुणाने पत्नीसह पोटच्या गोळ्याला संपवले; तीन वर्षांपूर्वीच झाला होता प्रेमविवाह

June 17, 2025
मोठी प्रगती! धनश्री मल्टिस्टेटने अल्पावधीतच उमटवला बँकिंग क्षेत्रात वेगळा ठसा; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे गौरवोद्गार

मोठी प्रगती! धनश्री मल्टिस्टेटने अल्पावधीतच उमटवला बँकिंग क्षेत्रात वेगळा ठसा; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे गौरवोद्गार

June 16, 2025
मोठी बातमी! सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते आज धनश्री मल्टीस्टेट आंधळगाव शाखेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन; ३५ शाखा, अल्प कालावधीत १२०० कोटींच्या ठेवीकडे वाटचाल

मोठी बातमी! सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते आज धनश्री मल्टीस्टेट आंधळगाव शाखेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन; ३५ शाखा, अल्प कालावधीत १२०० कोटींच्या ठेवीकडे वाटचाल

June 16, 2025
दिराने केला भावजयीचा विनयभंग तीघांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! मंगळवेढ्यात विवाहित महिलेचा विनयभंग; धर्मगावातील तरुणाविरोधात गुन्हा दाखल

June 16, 2025
माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

विदारक चित्र! मंगळवेढ्यातील ‘या’ दोन गावातून भिमा नदी पात्रातून दिवस-रात्र बेकायदा वाळू उपसा सुरू; पोलीस व महसूल प्रशासनाची डोळेझाक

June 16, 2025
अर्थकारण! मंगळवेढ्यातील ‘AD फायनान्स’चा आज चौथा वर्धापनदिन सोहळा; 3 हजारांपेक्षा जास्त ग्राहकांची 154 कोटींची कर्ज प्रकरणे मंजूर; सर्व लोन जलद सुविधा एकाच छताखाली

अर्थकारण! मंगळवेढ्यातील ‘AD फायनान्स’चा आज चौथा वर्धापनदिन सोहळा; 3 हजारांपेक्षा जास्त ग्राहकांची 154 कोटींची कर्ज प्रकरणे मंजूर; सर्व लोन जलद सुविधा एकाच छताखाली

June 14, 2025
मोठी बातमी! नवरा मेहुनीला घेऊन बेपत्ता, बायकोची मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार; एक महिना होत आला पत्नी अन् कुटुंब शोध घेऊन हैराण

मोठी बातमी! नवरा मेहुनीला घेऊन बेपत्ता, बायकोची मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार; एक महिना होत आला पत्नी अन् कुटुंब शोध घेऊन हैराण

June 12, 2025
कामाची बातमी! चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त सूर्योदय अर्बन व एल.के.पी मल्टिस्टेट बँकेत 1 हजारांच्या आरडी वरती 2 ग्रॅम चांदीचे नाणं मोफत

कामाची बातमी! चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त सूर्योदय अर्बन व एल.के.पी मल्टिस्टेट बँकेत 1 हजारांच्या आरडी वरती 2 ग्रॅम चांदीचे नाणं मोफत

June 11, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

लग्नामध्ये जेवणाच्या पंगतीत शिवीगाळ; दोन गटात तुंबळ हाणामारी, भांडण सोडवण्यासाठी आलेल्यांनाही मारहाण; तिघे गंभीर जखमी

June 10, 2025
Next Post
नागरिकांनो! अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मंगळवेढ्यात आज विविध कार्यक्रमाचे आयोजन

नागरिकांनो! अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मंगळवेढ्यात आज विविध कार्यक्रमाचे आयोजन

ताज्या बातम्या

गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

मोठी बातमी! यंदाही वारकऱ्यांना टोलमाफी, पंढरपूर पालखी मार्गावर टोल नाही; टोलमाफीचे स्टिकर्स मिळवण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय?

June 17, 2025
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

काय सांगता..! फक्त ‘इतक्या’ रुपयांचा चेक बाऊन्स झाला तरी तुरुंगवास? जाणून घ्या काय आहे कायदा…

June 17, 2025
सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

भयानक! ऑनलाइन रम्मीचा डाव संपूर्ण कुटुंबाच्या जीवावर बेतला; कर्जबाजारीपणातून तरुणाने पत्नीसह पोटच्या गोळ्याला संपवले; तीन वर्षांपूर्वीच झाला होता प्रेमविवाह

June 17, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

धक्कादायक! शाळेचा पहिलाच दिवस ठरला शेवटचा… भावाला आणताना ट्रकची दुचाकीला धडक, बहिण-भावाचा मृत्यू; कुटुंब लोटले दुःखाच्या खाईत

June 17, 2025
मोठी प्रगती! धनश्री मल्टिस्टेटने अल्पावधीतच उमटवला बँकिंग क्षेत्रात वेगळा ठसा; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे गौरवोद्गार

मोठी प्रगती! धनश्री मल्टिस्टेटने अल्पावधीतच उमटवला बँकिंग क्षेत्रात वेगळा ठसा; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे गौरवोद्गार

June 16, 2025
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

आनंदाची बातमी! गृह आणि कार लोन झालं स्वस्त; व्याजदरात मोठी कपात; कर्ज घेतलेल्यांना होणार मोठा फायदा

June 16, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..