टीम मंगळवेढा टाईम्स।
स्वराज्य सप्ताह निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मंगळवेढा शहर व तालुका यांच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 10 वाजता रांगोळी स्पर्धा
आज रविवार सकाळी 10 वाजता महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या वरती रांगोळी काढण्याचा विषय स्पर्धकांना देण्यात आला आहे.
साडे अकरा वाजता मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा
तसेच साडे अकरा वाजता 1 ते 12 वयोगटातील मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा आयोजन करण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषा मध्ये सदर स्पर्धकानी उपस्थित राहावे. सदर स्पर्धा महिला उद्योग केंद्र इंग्लिश स्कूल समोर घेणात येणार आहेत.
सायंकाळी सहा वाजता वकृत्व स्पर्धा
तसेच सायंकाळी सहा वाजता वकृत्व स्पर्धा घेण्यात येणार असून ५ ते १० वयोगटांमध्ये व १० ते २० वयोगटांमध्ये स्पर्धा होणार असून यामध्ये रयतेचं राज्य शिवबाचं या विषयावरती स्पर्धा होणार असून सदर स्पर्धेसाठी विविध बक्षिसे व ट्रॉफी देण्यात येणार आहे.
तसेच त्यानंतर स्वराज्य शपथ घेन्यात येणारं असून उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचे स्वराज्य सप्ताह निमित्त आवाहन करण्यात आलेले चित्रफित दाखवण्यात येणार आहे.
स्पर्धाचे विजेत्यांना बक्षीस वितरण
त्यानंतर विविध स्पर्धाचे विजेत्यांना बक्षीस वितरण आयोजित केलेले आहे. सर्व स्पर्धा व सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मंगळवेढा शहर व तालुका सर्व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज