mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महापूजेसाठी आज पंढरपूरमध्ये; असा असणार दौरा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 9, 2022
in सोलापूर
शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

टीम मंगळवेढा टाईम्स ।

आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यासाठी आज शनिवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पंढरपुरात आगमन होणार आहे.

मुख्यमंत्री शिंदे पंढरपूर दौऱ्यावर येणार असल्याने प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. अनेक आमदार आणि कार्यकर्त्यांकडून शहरातील प्रमुख रस्त्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे जागोजागी फलक लावण्यात आले आहेत.

आषाढी एकादशीची श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्याची प्रथा सुरु आहे.

या प्रथेनुसार मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे महापूजा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शनिवारी रात्री पुण्याहून पंढरपूर येथे आगमन होईल.

रविवारी पहाटे २.३० ते ४.३० वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा होईल.

मुख्यमंत्री शिंदे यांचे पंढरीत आगमन होणार असल्याने माजी मंत्री, आमदार तानाजी सावंत, आमदार महेश शिंदे, आमदार शहाजी पाटील आणि माजी आमदार प्रशांत परिचारक आदींच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागताचे फलक लावले आहेत

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे रविवार १० जुलै 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा होणार आहे.

या महापूजेसाठी आणि विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल.

शनिवार ९ जुलै रोजी पुणे येथून मोटारीने पंढरपूर कडे प्रयाण. पंढरपूर येथे रात्री ११.३० वा. आगमन व शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे आयोजित ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ कार्यक्रमाच्या समारोपास उपस्थिती.

रविवार १० जुलै रोजी मध्यरात्री २.३० ते पहाटे ४.३० श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजेसाठी उपस्थिती.

पहाटे ५.३० वा. विठ्ठल मंदिर परिसरातील इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमिपूजन.

पहाटे ५.४५ वा. नदी घाटाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सकाळी ११.१५ वा. शासकीय विश्रामगृह येथे सोलापूर जिल्हयातील सुंदर माझे कार्यालय या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणास उपस्थिती.

सकाळी ११.४५ वा. पंचायत समिती पंढरपूर येथे ‘स्वच्छता दिंडी’ समारोपास उपस्थिती. दु. १२.३० वा. पक्ष मेळाव्यास उपस्थिती.

दुपारी ३ वा. मोटारीने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण व तेथून शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण. सायं. ४.३० वा. मुंबई विमानतळ येथे आगमन व ठाण्याकडे प्रयाण.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 1, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

March 3, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; उर्वरित भागात कसं असेल हवामान

February 24, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

​शिष्यवृत्ती परीक्षेलाही ‘कॉपी’चा विळखा! सोलापूर जिल्ह्यात उत्तरांची खिरापत; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई करा

February 23, 2026
Next Post
अजित जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध समाजउपयोगी कार्यक्रमाचे आयोजन

कारखान्यात हिटलरपेक्षा मोठी हुकूमशाही; अजित जगताप यांचा खळबळजनक आरोप

ताज्या बातम्या

मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा