टीम मंगळवेढा टाईम्स ।
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीसाठी रात्री १२ वाजेपर्यंत वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी बहूजन रयत परीषदेच्या वतीने उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची यंदा १०३ वी जयंती साजरी होत आहे. अण्णाभाऊंना दैवत मानणारा मातंग समाज महाराष्ट्रात मोठया संख्येने आहे.
या समाजाच्या वतीने १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव साजरा केला जातो. यानिमित्ताने सर्व समाजबांधव एकत्र येतात.
विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे हा फक्त उत्सव नसून तो लोकोत्सव बनला आहे. असा हा लोकोत्सव साजरा करण्यासाठी संपूर्ण ऑगस्ट महिना रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी मिळावी,
या मागणीचे निवेदन बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, महिला प्रदेशाध्यक्षा कोमलताई ढोबळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधानभवन येथे दिले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज