टीम मंगळवेढा टाईम्स।
दामाजी कारखाना चालवताना कारखान्यावर 198 कोटीचे कर्ज केले असून कारखाना डबघाईला आणला आहे. तरी कारखाना वाचवण्यासाठी समविचारी आघाडीला निवडून द्या असा खोटा प्रचार करत आवताडे यांच्या हातून समविचारी आघाडीने कारखाना काढून घेतला होता.
मात्र नुकताच प्रसिद्ध झालेल्या कारखान्याच्या अहवालामध्ये या 200 कोटी कर्जाचा कुठेही उल्लेख दिसून आला नसून समविचारी आघाडीने केलेले आरोप हे धादांत खोटे असल्याचे त्यांनी स्वतःच सिद्ध केले असल्याचे दामाजीचे माजी संचालक सुरेश भाकरे यांनी बोलताना सांगितले.
दरम्यान, सुरेश भाकरे साहेब यांनी अहवाल समजत नसेल तर तज्ञलेखा परीक्षकाकडून अहवाल समजू घ्यावा. आपण १० वर्षे कारखान्याचे संचालक म्हणून काम केले आहात आपण ज्या अहवालावर बोलत आहात तो अहवाल आपणास समजत नसेल तर आपणास समजावणाऱ्या लेखा परीक्षकाकडून आहवाल समजून घ्यावा असे आवाहन विद्यमान संचालक दिगंबर भाकरे यांनी केले आहे.
दरम्यान, दामाजी कारखाना निवडणूक होऊन एक वर्ष लोटले तरी विरोधक व सत्ताधाऱ्यांमधील राजकारण संपेना अशी चर्चा सुरू असून यात कोण खरं कोण खोटं बोलतंय हे सभासदांना माहिती असल्याचे बोलले जात आहे.
तर पुढे बोलताना माजी संचालक सुरेश भाकरे म्हणाले की, सध्या दामाजी कारखान्यावर सत्तेमध्ये असलेल्या समविचारी आघाडीने खोटेनाटे बोलून सत्ता पदरात पाडून घेतली असली तरी कारखान्याच्या वार्षिक अहवालामध्ये सर्व गोष्टी उघड झाल्या आहेत.
समाधान आवताडे यांनी कारखान्यावर 200 कोटीचे कर्ज केले असून ते यापुढे कारखाना चालवू शकणार नाहीत असा अपप्रचार केला होता, मात्र समाधान आवताडे यांनी आपल्या प्रचार सभेमध्ये कारखान्यावर फक्त 75 कोटीचे कर्ज असल्याचे सांगितले होते ते सांगताना 2016 साली कारखाना आवताडे यांच्या हात्ती येताना कारखान्यावर 145 कोटी रुपये कर्ज होते
त्यातील 70 कोटी कर्ज फेडल्याचे ते वारंवार सांगत होते. त्याचबरोबर जिल्ह्यात दोन नंबर वर रिकव्हरी ठेवली होती. नुसत्या साखर उत्पादनावर कारखाना सुरू असताना सहा वर्षे कारखाना व्यवस्थित चालविला, चालू संचालक मंडळाला अजून थकीत पगार देता आला नाही,
दहा रुपयानेच साखर देणार असे म्हणत कारखान्याचे सभासद वाढ केली, स्वस्तात साखर मिळतेय या आशेने सभासदांनी दहा हजार रुपयांनी शेअर्स भरले यातून कारखान्याला दहा कोटी रक्कम गोळा केली व दहा रुपये किलोचे साखर वीस रुपये किलो करून दहा किलो साखरही कमी करत सभासदांचा विश्वासघात केला आहे, त्याच बरोबर सभासदांचा अपघाती विमाही बंद केला आहे यावरून चालू संचालक मंडळाचे निर्णय सभासद विरोधी असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
आमच्या संचालक मंडळाने प्रतिदिन दोन लाख लिटर क्षमता असलेल्या डिस्टलरी प्रकल्पाच्या सर्व परवानगी घेतल्या होत्या मात्र विद्यमान संचालक मंडळाला पुढे काहीच करता आले नाही.
प्रचारात कामगार पतसंस्थेचं देणं दिल नाही, म्हणून सांगणा-यांनी सत्ता आल्यावर किती देणी दिली? कामगारांच्या ब्रेकचा कालावधी वाढवून काही संचालकांच्या मर्जीतील कामगारांना कामावर बोलविले व प्रामाणिक व कष्टकरी गरीब कामगारांवर उपासमारीची वेळ आणली.
आमचे संचालक मंडळाच्या काळात मशिनरी मेंटेनन्स वरती सहा वर्षात १० ते १२ कोटी खर्च केला होता. या संचालक मंडळाने आवघ्या एक वर्षात १२ ते १४ कोटी खर्च केलेची चर्चा असून, या खर्चाला आडकाठी करणाऱ्या एका अधिकाऱ्याला कामावरून काढून टाकल्याचेही बोलले जात आहे.
त्याच बरोबर चालू संचालक मंडळाला निवडणुकीमध्ये मदत केलेल्या “सजग नागरिक संघाचे” पदाधीकारी मशिनरी पार्ट खरेदीच्या जादा बिले आकारलेले खात्री झाले नंतर बिलाची खातरजमा करण्यासाठी एक ते दोन वेळा कारखान्यावर गेले असता त्यांनाही टाळाटाळीचे उत्तरे देऊन पारदर्शी कारभाराचा नमुना दाखवलेची चर्चा आहे.
आ.आवताडेंचे काळातील संचालक मंडळाने वैयक्तिक मालमत्तेवर कर्ज काढून कारखाना व्यवस्थित चालविला सध्याच्या संचालक मंडळाच्या काळात कुणाचा कुणाला ताळमेळ असल्याचे दिसत नसून, सताधारी संचालक मंडळाने कर्ज कमी करण्या पेक्षा वाढवल्याचेच अहवालातून दिसून येत आहे.
त्यामुळे आहवालात दाखवलेला नफा कितपत खरा आहे यावर प्रश्न उपस्थित होत असून सभासदांनी निवडून दिलेले कारभारी नीट कारभार करतात का? हे अहवाल वाचून सभासदांनी ठरवीत वेळच्या वेळी जाब विचारणे गरजेचे आहे.
कारखाना कुणी चांगला चालविला याचे मूल्यमापन आगामी काळात सभासदच करतील
गोरगरीब सभासदांना सुरू असलेला अपघाती विमा चालू संचालक मंडळाने बंद केला असून तो विमा सुरू करून सभासद शेतकऱ्यांना आधार द्यावा तसेच सणासुदीला १० रुपये किलोने साखर देत गरिबांचे संसार आम्ही गोड केले होते मात्र या संचालक मंडळाने २० रुपये किलो दर करून ६० किलोची साखर ५० किलो केली आहे तेही पूर्ववत करावे. बाकी कोण खरे कोण खोटे हे अहवालातून स्पष्ट झाले असून कारखाना कुणी चांगला चालविला याचे मूल्यमापन आगामी काळात सभासदच करतील. – आ समाधान आवताडे.
दामाजीवरती केलेल्या आरोपांचा फाटलेला बुरका व कर्जाचा धूर असा दिसून येतो – संचालक दिगंबर भाकरे
भाकरे साहेब आपणास अहवाल समजत नसेल तर तज्ञलेखा परीक्षकाकडून अहवाल समजू घ्यावा. आपण १० वर्षे कारखान्याचे संचालक म्हणून काम केले आहात आपण ज्या अहवालावर बोलत आहात तो अहवाल आपणास समजत नसेल तर आपणास समजावणाऱ्या लेखा परीक्षकाकडून आहवाल समजून घ्यावा.
आपल्या पाठीमागच्या ५ वर्षाच्या कार्यकालाचा अहवाल समजून घेत असताना ३१.०३.२०२२ या आपल्या कार्यकाळातील आकडेवारी नमूद आहे आपण ती आकडेवारी अभ्यासपूर्ण व डोळे उघडे ठेवून पाहून घ्यावी. आपल्या काळात ज्या बँकेकडून जी कर्जे आपण घेतली त्या कर्जावरील व्याजाची तरतूद आपण कुठेही केली नाही. तसेच कर्जाची असणारी आकडेवारी स्पष्टपणे अहवालामध्ये आहेत आपण पाहून घ्यावेत.
परिशिष्ट ४ :- ३१.०३.२०२२ अखेर ३८ कोटी ७७ लाख, परिशिष्ट ५ :- १ कोटी १९ लाख, परिशिष्ट ६ :- २ कोटी ६२ लाख, परिशिष्ट ७ :- ३ कोटी २५ लाख, परिशिष्ट ८ :- ११२ कोटी ८३ लाख
तसेच ३१.०३.२०२२ नंतरचे आपल्या कार्यकाळातील बँक व इतर अॅडव्हांस खालीलप्रमाणे
यशोदा पतसंस्था ३ कोटी २३ लाख, मोलेसेस ११ कोटी, साखर विक्री अॅडव्हांस – ५ कोटी ५० लाख, १७८ कोटी ३९ लाख मुद्दल व आपण आपल्या ५ वर्षाच्या कार्यकाळात या कर्जाच्या रकमेवरील व्याज तरतूद केलेली नाही या रकमेची व्याजाची रक्कम काढली असता जवळपास ४० कोटी रु रक्कम व्याज देणे शिल्लक आहे
याचा हि अभ्यास आपण तज्ञ लेखा परीक्षकाकडून अवगत करून घ्यावे तसेच खाजगी व्यापाऱ्याकडून वार्षिक ३६ % व्याज दराने एकूण १६ कोटी ५० लाख रु कोणी आणि कशासाठी इतक्या व्याजदराने घेण्यात आले याचा खुलासा माजी संचालक व कारखान्याचे हितचिंतक म्हणून आपणास माहित नसेल तर माहिती करून आपण खुलासा करावा
जर आपल्याला वरील माहिती खोटी वाटत असेल तर आपण आपल्या कारखान्यावरती येवून समोरासमोर चर्चा करावी आपण दिलेली माहिती तालुक्यातील ४० हजार सभासदाची फसवणूक व दिशाभूल करणारी आहे. माझ्या सारख्याला विद्यमान संचालक म्हणून असे वाटते कि आपण एका नामवंत जिल्हा बँकेत अधिकारी म्हणून कामकाज केले असल्याने अशा प्रकारचे न समजणे इतपत अडाणी सारखे बोलून सभासदाचे रोष ओढवून घेऊ नये
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज