टीम मंगळवेढा टाईम्स ।
एकीकडे मंगळवेढ्याला ‘संतांची भूमी’ म्हणून ओळखले जाते, तर दुसरीकडे याच शहरात सध्या जुगाराच्या अड्ड्यांनी आपले हातपाय पसरले आहेत.

मंगळवेढा शहरात व परिसरात राजरोसपणे सुरू असलेल्या या जुगार क्लबमुळे तरुण पिढी व्यसनाच्या गर्तेत अडकत चालली आहे.

महत्त्वाचे म्हणजे, हे सर्व सुरू असतानाही संबंधित विभाग याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याने, ‘या अड्ड्यांना नेमके अभय कुणाचे?’ असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
जुगारात पैसे गमावल्यानंतर तरुण आपली आर्थिक तूट भरून काढण्यासाठी खाजगी सावकारांच्या जाळ्यात अडकत आहेत. यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.

आता पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी या गंभीर प्रकाराची दखल घेऊन कोणती धडक कारवाई करतात, याकडे संपूर्ण मंगळवेढेकरांचे लक्ष लागले आहे.

“जुगार आणि खाजगी सावकारीच्या चक्रामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे. पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, त्वरित कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.”

तरुण पिढी सावकारीच्या विळख्यात
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवेढ्यातील अनेक तरुण या जुगार अड्ड्यांकडे आकर्षित होत आहेत. जुगारात पैसे हारल्यानंतर ते कव्हर करण्यासाठी तरुण पुन्हा खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेत आहेत.

यामुळे अनेक तरुण कर्जबाजारी होऊन आयुष्याच्या चुकीच्या वळणावर उभे राहिले आहेत. जुगार आणि सावकारी या दुष्टचक्रामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.
प्रशासनावर वाढला दबाव
हा सर्व प्रकार ठीक ठिकाणी सुरू असूनही स्थानिक पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. या अवैध धंद्यांना कुणाचे राजकीय वरदहस्त आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.

आता पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन, या जुगार अड्ड्यांवर कारवाई करून कायदेशीर वचक निर्माण करतील का? याकडे संपूर्ण मंगळवेढेकरांचे लक्ष लागले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












