टीम मंगळवेढा टाईम्स ।
मागच्या संचालक मंडळाने सभासदांना मतदानापासून वंचित ठेवले. भविष्यात या संस्थेचा पोटनियम सर्वसाधारण सभेत बदलून 28 हजार अधिक इथून पुढे नव्याने होणारे सभासद यांना त्यांचा अधिकारी मिळवून देणार असल्याची घोषणा नूतन चेअरमन शिवानंद पाटील यांनी केली आहे.
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना अध्यक्षपदी समविचारी गटातील परिचारक समर्थक शिवानंद पाटील यांची तर उपाध्यक्षपदी तानाजी खरात यांची निवड बिनरोध करण्यात आली याप्रसंगी ते बोलत होते.
चेअरमन पाटील पुढे बोलताना म्हणाले की, येणाऱ्या पाच वर्षात 28 हजार सभासद कधीही चेअरमन म्हणून कारखान्याचे कामकाज पाहण्यासाठी येऊ शकतात. कोणालाही कोणत्या प्रकारची आढवणूक केली जाणार नाही.
प्रत्येक सभासदांना कारखान्याचे सर्व व्यवहार पाहण्याचा अधिकार त्यांना आम्ही देत आहोत. दामाजी कारखान्याचे सभासत्व खुले करणार असल्याची त्यांनी यावेळी सांगितले.
समविचारी आघाडी घडवण्यात अनेक बड्या नेत्यांनी योगदान दिले आहे. दामाजी कारखाना टिकला पाहिजे या दृष्टीने आम्ही सर्वजण एकत्र आलो होतो.
स्व.मारवाडी वकील व स्व.रतनचंद शहा गेली तीस वर्षापासून ते स्व.भारत नाना भालके यांच्या कार्यकाळापर्यंत ही संस्था चांगल्या पद्धतीने चालवली गेली. त्यांचाच वारसा आणि विचार समोर घेऊन येणारे पाच वर्ष संस्थेचे हित जोपासून काम करणार आहोत.
कोणत्याही प्रसंगाला कोणत्याही अडचणीला बाजूला सारून निश्चितपणाने दामाजी कारखाना चांगल्या पद्धतीने चालवून एक आदर्श उभा करणार आहोत.
दामाजी कारखान्यावर जवळपास 197 कोटीचे कर्ज आहे. बँक देणी व विविध व्यापारी देणी केन पेमेंट आहेत. आम्ही 197 कोटींचा बोजा घेऊन काम करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
आज निवडणूक निर्णय अधिकारी अप्पासाहेब समिंदर यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळावर अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आले त्यामध्ये अध्यक्षपदासाठी शिवानंद पाटील यांनी तर उपाध्यक्ष पदासाठी तानाजी खरात यांनी अर्ज दाखल केले दोघेही बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले.
अध्यक्ष शिवानंद पाटील हे लिंगायत समाजातील एक प्रभावी व्यक्तिमत्व असल्याने साखर कारखानदारीत अग्रेसर असलेल्या परिचारक परिवाराचा देखील दामाजी कारखाना चालवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.
दामाजी कारखान्यांमध्ये यापूर्वी संचालक म्हणून प्रभावी काम केल्यामुळे त्याच्या यापूर्वीच्या कामाचा त्यांना आता फायदा होणार आहे.
उपाध्यक्ष तानाजी खरात हे धनगर समाजातील प्रभावी व्यक्तिमत्व असून नुकत्याच झालेल्या कारखान्या निवडणुकीत ते सर्वाधिक मतांनी विजयी झाले.
कारखाना प्रशासनावर त्यांचा मोठा वचक राहणार असल्याने शिवाय कारखान्याच्या सत्तांतरामध्ये त्यांनी निर्णायक योगदान दिल्यामुळे त्यांना उपाध्यक्ष पदाची संधी देण्यात आली. निवडीनंतर समर्थकांनी जल्लोष केला
यावेळी धनश्री परिवाराचे शिवाजीराव काळुंगे बळीराजा परिवाराचे दामोदर देशमुख जिजामाता परिवाराचे रामकृष्ण नागणे,अॅड नंदकुमार पवार,प्रकाश गायकवाड,
रामचंद्र वाकडे,युन्नुश शेख,दत्तात्रय खडतरे,शशिकांत बुगडे,यादाप्पा माळी,चंद्रशेखर कौडूभैरी,अरूण किल्लेदार,मुरलीधर दत्तू गोपाळ भगरे गौरीशंकर बुरुकुल तानाजी खरात राजेंद्र पाटील दयानंद सोनगे भारत बेदरे रेवणसिद्ध लिगाडे,औदुंबर वाडदेकर,
लता कोळेकर, निर्मला काकडे, बसवराज पाटील,श्रीकांत साळे, भिवा दौलतोडे, पी.बी.पाटील, महादेव लुगडे, तानाजी कांबळे ,दिगंबर भाकरे, गौडाप्पा बिराजदार यांच्यासह शेतकरी सभासद मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज