टीम मंगळवेढा टाईम्स ।
मराठा समाजाला ओबीसीच्या सवलती दिल्या जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी येथील सभेत जाहीर केले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधी आपण जाहीर सभेत शब्द दिला होता.
तो शब्द पूर्ण केल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय मध्यरात्री घेण्यात आला. त्याविषयाचा अध्यादेश काढण्यात आला.
त्याची राजपत्रात नोंद करण्यात आली. ‘हा तुमच्या विजयाचा दिवस’ असल्याचे ते म्हणाले. आपण मराठा समाजाला आरक्षण देण्याचा वायदा पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले.
सरकार आरक्षणाबाबत गंभीर
मंत्रिमंडळ, उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून मराठा आरक्षण देण्यात आले आहे. सरकार या आरक्षणाबाबत गंभीर असल्याचा शब्द त्यांनी यावेळी दिला. जो अध्यादेश काढला, त्याची जबाबदारी सरकारने घेतल्याचे त्यांनी जाहीर केले. आरक्षणाबाबत आपण समाजाला जो शब्द दिला होता. तो आज पूर्ण केल्याचा आनंद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हे सर्वसामान्यांचे सरकार असल्याचे ते म्हणाले. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिशी उभा ठाकला. त्यांनी शांतते मोर्चा काढाला. आंदोलन केले. इतर कोणाच्याही भावना दुखावल्या नाहीत, अशी कौतुकाची थाप सुद्धा त्यांनी दिली.
कायद्याच्या चौकटीतील आरक्षण देणार
यावेळी बोलताना कायद्याच्या चौकटीतील आरक्षण, टिकणारं आरक्षण देणार असल्याची ग्वाही त्यांनी मराठा आंदोलकांना दिली. फेब्रुवारी महिन्यात मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलविण्यात येणार आहे. त्यात याविषयीचा कायदा मंजूर करण्यात येऊ शकतो. मराठा समाजाला सगेसोयऱ्यांसह आरक्षण देण्याचे त्यांनी मान्य केल्याचे जाहीर केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज