
अक्षय फुगारे । महाराष्ट्र राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाखांच्या पार गेली असून जुलैच्या सुरुवातीलाच एकाच दिवशी ८०१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १ हजार १७२ झाली आहे. Number of coronamuktas in Maharashtra is in lakhs: Rajesh Tope
आज सर्वाधिक बरे झालेले रुग्ण मुंबई मंडळातील असून या विभागातून ७०३३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे , अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आज एकाच दिवशी ८०१८ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.२१ टक्के एवढे झाले आहे.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












