mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बुलढाण्यातील लोक अचानक टकले का झाले? अखेर झाला उलगडा; तुम्हीही ही चूक तर करत नाही ना? जाणून घ्या…

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 10, 2025
in आरोग्य, राज्य
सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

देशात एचएमपीव्ही या व्हायरसने दस्तक देऊन नागरिकांमध्ये दहशत माजवलेली असतानाच बुलढाण्यात वेगळ्याच आजाराने डोकं वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बुलढाण्यातील शेगावमधील ग्रामस्थ अचानक टकले होत आहेत.

त्यांचे डोक्याचे आणि दाढीचे केस अचानक गळू लागले आहेत. त्यामुळे गावात जो तो टकला दिसत आहे. पुरुषच नाही तर महिलांमध्येही ही समस्या दिसत आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

हा काय प्रकार आहे? ही भानामती आहे की वेगळाच काही व्हायरस आहे, अशी चर्चा गावात सुरू आहे. या प्रकाराची सरकारने गंभीर दखल घेतली असून या सर्व प्रकारामागचं कारणही समोर आलं आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील केस गळती प्रकरणात आता मोठी अपडेट हाती आली आहे. शेगाव तालुक्यातील बोंडगावातील आणि खातखेड येथील पाण्यात नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे.

तर पाण्याची टीडीएस लेव्हलही भयंकर वाढली असल्याचं या पाण्याच्या तपासणीत उघड झालं आहे. त्यामुळेच गावकऱ्यांसाठी हे पाणी वापरणं विष ठरत आहे. परिणामी गावातील लोकांच्या केस गळतीचं प्रमाण वाढलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

खारपाणपट्ट्यातील या गावात पिण्याची पाण्याची वेगळी सोय करण्यात आली आहे. मात्र वापरण्याच्या पाण्यात नाइट्रेट सारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळल्याने हे पाणी वापरण्यायोग्य देखील नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

दरम्यान, शेगांव तालुक्यातील टक्कल पडणाऱ्यांची संख्या आता 100च्या वर पोहोचली आहे. तीनच दिवसात टक्कल पडत असल्याच्या प्रचंड तक्रारी आल्याने आरोग्य विभागाकडून शेगाव तालुक्यातील घरोघरी सर्वेक्षण सुरू केलं आहे. चर्मरोग तज्ज्ञांचे पथकही गावात दाखल झाले असून प्रथम कठोरा, बोंडगाव, हिंगणा या गावांत तपासणी सुरू केली आहे.

फंगल इन्फेक्शनचा हा प्रकार असल्याचे मत तज्ज्ञांनी प्रथमदर्शनी व्यक्त केलं असून हा आजार पाण्यामुळे होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आलं आहे. गावातील पाणी, स्कीनचे नमुने घेण्यात आले असून ते नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्य विभगाना दिलीय. अहवाल आल्यावर केस गळण्याचे नेमके कारण समोर येणार आहे.

काय आहेत लक्षणं ?

या गावातील लोकांना डोक्याला आधी खाज येते. त्यानंतर हळूहळू केस गळू लागतात आणि तीन दिवसातच संपूर्ण टक्कल पडत आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. दाढीचेही केस गळत असल्याने गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. एकट्या बोंडगावात 16 रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती त्वचा रोग तज्ज्ञ डॉ. बालाजी आद्रट यांनी दिली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: टक्कल व्हायरस

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चित; आयपीएस बिरुदेव डोणे यांचे मंगळवेढ्यात प्रतिपादन

विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चित; आयपीएस बिरुदेव डोणे यांचे मंगळवेढ्यात प्रतिपादन

November 16, 2025
सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ग्रामपंचायतींवर येणार प्रशासक; गावातील लोक झाले सक्रिय

उमेदवारांसाठी सर्वात मोठी बातमी! ऑनलाईन सर्व्हरच्या भीतीने अर्ज आता ‘ऑफलाईन’ ही स्वीकारणार; रविवारी सुट्टीच्या दिवशीही संधी

November 15, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

लागा तयारीला! जिल्हा परिषद निवडणुकीची लवकरच होणार घोषणा; ‘या’ दिवशी वाजणार बिगुल? राजकीय चर्चांना उधाण

November 14, 2025
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

वडिलांना घराचा ताबा देऊन मुलांनी घर रिकामे करावे, वडिलोपार्जित जमिनीत उत्पन्नापैकी ५० टक्के वार्षिक हिस्सा वडिलांना द्या; आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांना प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

November 14, 2025
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

लग्नाळू! माझं लग्न होत नाहीये, मला पत्नी मिळवू द्या, तुमचे उपकार विसरणार नाही; अस्वस्थ सिंगल तरुणाचं ‘या’ बड्या नेत्याला पत्र

November 14, 2025
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

खळबळ! प्रलंबित खटल्याचा निकाल बाजूने देण्यासाठी 15 लाख मागितले, सत्र न्यायाधीशावर गुन्हा दाखल; लाचलुचपत विभागाची कारवाई

November 13, 2025
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

मोठी बातमी! मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या हत्येचा कट; धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय ‘या’ व्यक्तीला अटक

November 12, 2025
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.आवताडेंनी मोठा डाव टाकला; उद्धव ठाकरेंच्या निष्ठावंताला गळाला लावले, भाजपची ताकद वाढली

November 12, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! कृषी विभागाचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य बदलले; पूर्वी ‘शेतकऱ्यांच्या सेवार्थ’ तर आता ‘ही’ अशी असणार टॅगलाईन

November 10, 2025
Next Post
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

दानशूर भक्त! विठ्ठल-रुक्मिणी चरणी 'एवढ्या' लाखांचे सोने-चांदीचे दागिने केले अर्पण; पुत्रदा एकादशी निमित्त पंढरीत लाखांवर भाविक

ताज्या बातम्या

मोठा ट्विस्ट! सुप्रिया जगताप यांना भाजपची उमेदवारी, तेजस्विनी कदम यांनी बंडखोरी करत भरला अपक्ष अर्ज, समविचारी कडून सुनंदा आवताडे; तर माजी सभापती यांना उमेदवारी

मोठा ट्विस्ट! सुप्रिया जगताप यांना भाजपची उमेदवारी, तेजस्विनी कदम यांनी बंडखोरी करत भरला अपक्ष अर्ज, समविचारी कडून सुनंदा आवताडे; तर माजी सभापती यांना उमेदवारी

November 17, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

दुर्दैवी घटना! लेकीसोबत अखेरची भेटही होऊ शकली नाही; मुलीच्या घरी जाताना वाटेत मृत्यू आडवा आला, मंगळवेढा हळहळलं

November 17, 2025
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

धक्कादायक! कंपनीच्या कामाकरिता जात असताना मोटर सायकलचा अपघात होवून मंगळवेढ्यातील तरुण ठार

November 17, 2025
आता माघार नाही! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी प्रा.तेजस्विनी कदम आज उमेदवारी अर्ज भरणार; पक्षाने दिली तर ठीक, अन्यथा..? जनतेचा पाठिंबा वाढला

आता माघार नाही! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी प्रा.तेजस्विनी कदम आज उमेदवारी अर्ज भरणार; पक्षाने दिली तर ठीक, अन्यथा..? जनतेचा पाठिंबा वाढला

November 17, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढ्यात राजकीय हालचालींना वेग! नगराध्यक्षपदासाठी १ तर नगरसेवक पदासाठी ३७ अर्ज दाखल; नगराध्यक्षपदावरून गुप्त बैठका सुरू

November 16, 2025
विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चित; आयपीएस बिरुदेव डोणे यांचे मंगळवेढ्यात प्रतिपादन

विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चित; आयपीएस बिरुदेव डोणे यांचे मंगळवेढ्यात प्रतिपादन

November 16, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा