टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने कुविख्यात आंतरराज्यीय गुन्हेगाराची टोळीचा पर्दापाश केला असून चोरी व दरोडा असे ३२ गुन्हे करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या संशयीत आरोपीला अटक करून नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
सुखदेव धर्मा पवार (वय ५५ ) , अंबादास शंकर गायकवाड ( दोघे रा. होटगी, ता दक्षिण सोलापूर ) या दोघांना अटक केली.
दरम्यान या दोघांना १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
दि.६ फेब्रुवारी २०२२ रोजी गंगाराम बयाजी वाघमोडे (वय ३४ , रा . शिरनांदगी, ता.मंगळवेढा) हे मौजे नांदणी ता. दक्षिण सोलापूर येथील हॉटेल निसर्ग येथे मॅनेजर म्हणून कामकाज करत होते.
अचानक पहाटे २ च्या सुमारास अनोळखी इसम हॉटेलमध्ये आले. त्यांनी फिर्यादी झोपलेला असल्याचे पाहून त्यांचे तोंडावरील चादर ओढली. व मारहाण करून बांधून ठेवले.
फिर्यादीने कोण आहे ? असे विचारले असता काही न बोलता त्यांच्या खिशातील २० हजार रूपये व मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला त्यानंतर हॉटेलमधील विदेशी कंपनीचे दारुचे २८ बॉक्स असा एकूण २ लाख ३१ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याचा गुन्हा मंद्रुप पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.
पोलिसांनी माहिती काढली असता, हा गुन्हा होटगी येथील रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी अन्य साथिदारांच्या मदतीने केल्याचे समजले. त्यापैकी सुखदेव पवार हा सलगरवस्ती भागात आल्याची माहिती स.पो.नि. रविंद्र मांजरे यांच्या पथकास मिळाली.तेथून त्यास ताब्यात घेतले.
त्याच्याकडे तपास केला असता, त्याने गुन्हयाची कबूली देवून होटगी येथील त्याच्या ओळखीच्या एका इसमाच्या सांगण्यावरून विदेशी दारूचे बॉक्स चोरून होटगी ता. दक्षिण सोलापूर येथे उतरून एका रूममध्ये ठेवल्याचे सांगितले.
त्या इसमाबाबत माहिती घेतली असता तो अंबादास गायकवाड असल्याचे समजले त्यास वागदरी येथील नवीन ब्रिजजवळ सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्याकडून जिल्हयातील १ दरोडा व ४ घरफोडी गुन्हयांची उकल झाली आहे.
८ संशयीत दरोडेखोर फरार
या गुन्ह्यातील सुरेश धर्मा पवार, राजू रज्जूलाल पवार , बापू शंकर काळे , सोहेम , विनोद बापू पवार , परसू काळे ( सर्व रा . होटगी , ता . दक्षिण सोलापूर ) , गिरमल उर्फ गिरमा अंबादास काळे ( रा . मैंदर्गी , ता . अक्कलकोट ) , गोविंद संजय काळे ( रा . हनमगाव , ता . दक्षिण सोलापूर ) हे आठ संशयीत दरोडेखोर फरार आहेत. पोलीस तपास करत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज